Dog invades pitch : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यामध्ये तिसरी आणि निर्णायक वनडे (India vs Australia 3rd ODI) खेळवण्यात आली आहे. एम. चिदंबरम स्टेडियममध्ये हा सामना रंगला असून एक वेळ अशी आली होती की, सामना काही वेळ थांबवावा लागला होता. झालं असं होतं की, मैदानात एक कुत्रा घुसला (A dog entered the field) होता. हा कुत्रा भर मैदानात इथे-तिथे धावपळ करत होता. या कुत्र्याच्या धावपळीने सुरक्षा रक्षकांची मात्र चांगलीच धावपळ उडालेली दिसली.
ही घटना ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत असताना 43 व्या ओव्हरमध्ये झाली. यावेळी कुलदीप यादव गोलंदाजी करत होता. तो चौथा बॉल टाकणार तेवढ्यात हा कुत्रा धावत धावत ग्राऊंडमध्ये घुसला. हा कुत्रा ग्राऊंला गोल फेऱ्या मारत होता. यावेळी सुरक्षा रक्षक कुत्र्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावत होते, मात्र तो त्यांच्या हाती लागला नाही.
कुत्रा मैदानात घुसल्यानंतर काही खेळाडू त्याच्यापासून चार हात लांबच राहणं पसतं करत होते. यावेळी जडेजाने सुरक्षा रक्षकांची मदत करण्याचा ठरवलं आणि कुत्र्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये तो देखील अपयशी ठरला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. दरम्यान यामध्ये रोहित शर्माला हसू आवरता आलं नाही.
No extra fielders please... #INDvsAUS https://t.co/juNwpd6hmM pic.twitter.com/xNJSilNiyJ
— Smriti Sharma (@SmritiSharma_) March 22, 2023
एखादा प्राणी लाईव्ह सामन्यात मैदानात घुसल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या सामन्यादरम्यान मैदानात साप घुसला होता. तर अनेकदा कुत्रा तसंच मांजर घुसल्याच्याही घटना घडल्या आहेत.
आजचा सामना खूप महत्त्वाचा मानला जातोय. कारण हा सामना निर्णायक सामना ठरणार आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात प्रथम टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी कांगारूंनी 270 रन्सचं आव्हान दिलं आहे. यावेळी हार्दिक आणि कुलदीपच्या गोलंदाजीची जादू दिसून आली. दोघांनीही प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतले. तर अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराजच्या खात्यात 2-2 विकेट्स आहे.
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक म्हणजेच 47 रन्सची खेळी केली. मात्र आजच्या सामन्यात कर्णधार स्टिव्ह स्मिथला चांगला खेळ करता आला नाही. आजच्या सामन्यात तो भोपळाही फोडू शकला नाही.