मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा रन मशीन आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वात फिट खेळाडूंपैकी एक आहे. त्याचा फिटनेसबद्दल अनेकांना जाणून घेण्याची इच्छा असते. विराट कोहली स्वतः केवळ फीटनेस फ्रिक नाहीये तर त्याने टीममध्येही फिटनेसचं कल्चर निर्माण केलं आहे. इतर अनेक खेळाडूंसाठी तसंच फॅन्ससाठी तो प्रेरणा आहे.
विराट कोहली फिटनेसबाबत अत्यंत काटेकोर असतो. कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विक्रमांची नोंद करत असतो. कोहली बाऊंड्रीपेक्षा जास्त रन्स करून धावून घेण्यावर भर देतो. तो जगातील नंबर 1 फलंदाज आहे. विराट कोहलीने स्वतः त्याच्या डाएटचं सिक्रेट सांगितलं होतं.
इन्स्टाग्रामवर चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देताना कोहलीने स्वतःच्या डाएटबाबत माहिती दिली होती. विराटने सांगितलं की, तो त्याच्या आहारात भरपूर भाज्या, अंडी, दोन कप कॉफी, डाळ, किनोआ, भरपूर पालक आणि डोसा यांचा समावेश करतो. भारतीय कर्णधार बदाम, प्रोटीन बार आणि कधीकधी चायनीस देखील टेस्ट करतो.
कोहलीला छोले भटुरे खाण्याची फार आवड आहे. त्याने स्वतः याबाबत सांगितलं होतं. त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, जर त्याचा कधी चीट डे असेल तर तो छोले भटुरे खातो.