टीममध्ये नसतानाही दिनेश कार्तिक बनवणार टीम इंडियाला 'चॅम्पियन'; पाहा काय करतोय?

WTC Final 2023 IND vs AUS: तब्बल 20 वर्षांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ आयसीसी (ICC Tournament) टूर्नामेंटच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहे. त्यामुळे आता दोन्ही संघांमध्ये काटे की टक्कर पहायला मिळू शकते. 

Updated: Jun 7, 2023, 11:22 AM IST
टीममध्ये नसतानाही दिनेश कार्तिक बनवणार टीम इंडियाला 'चॅम्पियन'; पाहा काय करतोय? title=
Dinesh Karthik, WTC final 2023

Dinesh Karthik On WTC Final 2023: इंग्लंडमधील 'द ओव्हल मैदान' जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम (WTC final 2023) सामन्यासाठी सज्ज झाले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पाच दिवसीय कसोटी सामन्यात विजेतेपदाची लढत होणार आहे. विशेष म्हणजे 20 वर्षांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ आयसीसी (ICC Tournament) टूर्नामेंटच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहे. त्यामुळे आता दोन्ही संघांमध्ये काटे की टक्कर पहायला मिळू शकते. त्यामुळे आता सर्वजण या सामन्यावर लक्ष ठेऊन आहेत.

ऑस्ट्रेलियाची टीम वगळता अनेक दिग्गज खेळाडू इंग्लंडच्या दौऱ्यावर आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपनंतर (World Test Championship) मानाची अशी अॅशेस मालिका (Ashes series) देखील खेळवली जाणार असल्याने ऑस्ट्रेलिय संघ विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरेल. त्यासाठी दिग्गजांची तुकडी इंग्लंडच्या दिशेने रवाना झालीये. अशातच आता भारताची काही खेळाडू देखील इंग्लंडमध्ये पोहोचले आहेत. अशातच सध्या टीम इंडियाला बाहेरून मदत करतोय तो दिनेश कार्तिक.

आणखी वाचा - WTC 2023 Final: ड्रेसिंग रूममध्ये शुभमन गिल आणि ईशान किशनमध्ये राडा, सिराजही झाला शॉक; पाहा Video

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी खेळपट्टी तयार आहे. कालच्या 9 मिमीच्या तुलनेत आज गवत 6 मिमी आणि थोडंस तपकिरी आहे, अशी माहिती दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाला आपली रणनिती तयार करण्यास मदत होईल, असं नेटकऱ्याचं म्हणणं आहे. दिनेश कार्तिक सध्या इंग्लंडमध्ये असून तो मैदानातील प्रत्येक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे, टीममध्ये नसताना देखील डीके टीम इंडियाला चॅम्पियन बनवणार, अशी कमेंट देखील अनेकांनी केली आहे.

दरम्यान, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम (WTC 2023 Final) सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे. दोन्ही संघांचे कर्णधार रोहित शर्मा आणि पॅट कमिन्स यांच्यात नाणेफेक (Ind vs Aus Toss Update) दुपारी अडीच वाजता होणार आहे. या सामन्यात नाणेफेकही महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याने कोण लकी ठरणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.