आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर Dinesh Karthik ची थेट टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये एन्ट्री

Dinesh Karthik : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा (T20 World Cup) थरार आता येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. अशातच आता 40 जणांच्या टीममध्ये दिनेश कार्तिकची निवड झालीये.

सौरभ तळेकर | Updated: May 24, 2024, 05:03 PM IST
आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर Dinesh Karthik ची थेट टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये एन्ट्री title=
Dinesh Karthik named in elite commentary panel for T20 World Cup

Dinesh Karthik In T20 World Cup : आरसीबीचा स्टार फिनिशर आणि विकेटकिपर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik ) याला आरसीबीने गार्ड ऑफ ऑनर दिला अन् दिनेश कार्तिकने आयपीएलला (IPL) रामराम ठोकल्याचं निश्चित झालं. डीकेने अधिकृतरित्या घोषणा केली नसली तरी आरसीबीच्या (RCB) चाहत्यांसाठी हा धक्का होता. अशातच आता डीकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलीये. दिनेश कार्तिक आता पुन्हा टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) दिसणार आहे. खेळताना नाही तर तो समालोचन (commentary) करणार आहे.

येत्या 1 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2024) सुरु होणार आहे. अशातच आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने आगामी ट्वेंटी-ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी समालोचकांचे पॅनल जाहीर केलंय. एकूण 40 जणांची टीम जाहीर झाली. यामध्ये दिनेश कार्तिकचा समावेश करण्यात आलाय. 

वर्ल्ड कपसाठीचे 40 समालोचक कोण?

डेल स्टेन, ग्रीम स्मिथ, मायकेल अथर्टन, वकार युनिस, सायमन डौल, शॉन पोलॉक, केटी मार्टिन, मम्पुमेलो एमबांगवा, नताली जर्मनोस, डॅनी मॉरिसन, ॲलिसन मिशेल, ॲलन विल्किन्स, ब्रायन मुर्गाट्रॉयड, माईक हेसमन, इयान वॉर्ड, अथर अली खान, रुसेल अर्नोल्ड, नियाल ओब्रायन, कॅस नायडू, डॅरेन गंगा. रिकी पाँटिंग, सुनील गावस्कर, मॅथ्यू हेडन, रमिझ राजा, इऑन मॉर्गन, टॉम मूडी, वसीम अक्रम, रवी शास्त्री, नासेर हुसैन, इयान स्मिथ, मेल जोन्स, हर्षा भोगले, इयान बिशप, दिनेश कार्तिक, एबोनी रेनफोर्ड-ब्रेंट, सॅम्युअल बद्री, कार्लोस ब्रॅथवेट, स्टीव्ह स्मिथ आणि ॲरॉन फिंच यांचा समावेश आहे. 

टी-ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेत भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका, वेस्ट इंडिज, ओमान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी, नेपाळ, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका , बांगलादेश आणि नेदरलँड्स हे 20 संघ सहभागी होणार आहेत.

टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान.