Dinesh Karthik On Jasprit Bumrah: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात (WTC Final 2023) भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावांनी पराभव झाला. पहिल्या डावात भारतीय संघाच्या खराब गोलंदाजी केल्याने गोलंदाजांवर टीका होत आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पहिल्या डावात 469 धावा करत ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी मिळाली, पण भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या डावात पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाचा डाव 270 धावांवर संपुष्टात आणला. भारताने पहिल्या डावात 296 धावा केल्या आणि दुसऱ्या डावात केवळ 234 धावा करता आल्या. ज्यामुळे भारताचा पराभव झालाय. या पराभवामुळे आगामी एकदिवसीय विश्वचषकातील गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सध्या टीम इंडियाची मदार ही मोहम्मद शमी आणि सिराज या दोघांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे टीम इंडियाला स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहची कमी अजूनही जाणवत आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप समालोचक दिनेश कार्तिकने भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहबद्दल गुड न्यूज दिलीये. त्यामुळे आता सर्व भारतीयांचे चेहरे खुलले आहेत.
बुमराहबाबत दिनेश कार्तिक याने मोठं वक्तव्य केलं आहे. जसप्रीत बुमराह आयर्लंडविरुद्धच्या T20I मालिकेनंतर पुनरागमन करेल. जसप्रीत बुमराहच्या फिटनेसमध्ये सुधारणा झाली आहे आणि तो लवकरच भारतीय संघात पुनरागमन करेल, असं दिनेश कार्तिक म्हणाला आहे. सप्टेंबर 2019 पासून एकही आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत क्रिकेट जसप्रीत बुमराह खेळलेला नाही.
आणखी वाचा - ICC WTC Final: ना भारताला जमलं ना पाकड्यांना; अशी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलिया पहिलाच देश!
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या दिवशी बोलताना दिनेश कार्तिकने जसप्रीत बुमराहच्या तब्येतीची माहिती दिली आहे. जसप्रीत बुमराहच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाल्यामुळे तो सप्टेंबर 2019 पासून अनफिट आहे म्हणून तो IPL 2023 देखील खेळला नाही. जसप्रीत बुमराहच्या पाठदुखीमुळे त्याचा पाठीवर शस्त्रक्रिया करावी लागली आणि तेव्हापासून जसप्रीत बुमराह क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहे.
दरम्यान, 2023 च्या शेवटी एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे. आणि त्यामुळे जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनामुळे भारतीय संघ मजबूत होईल आणि भारतीय संघाची गोलंदाजी मजबूत होईल. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजसोबत जसप्रीत बुमराह आला तर ही भारतासाठी मोठी बातमी असेल.