धोनी म्हणतो मला याचेच पैसे मिळतात !

दीपक चहरची शानदार बॉलिंग(३/१५) आणि अंबाती रायडू(७९) आणि सुरेश रैना(नाबाद ५४) रनच्या धडाकेबाज खेळीमुळे आयपीएलमध्ये चेन्नईनं हैदराबादचा पराभव केला.

Updated: Apr 23, 2018, 06:03 PM IST
धोनी म्हणतो मला याचेच पैसे मिळतात ! title=

हैदराबाद : दीपक चहरची शानदार बॉलिंग(३/१५) आणि अंबाती रायडू(७९) आणि सुरेश रैना(नाबाद ५४) रनच्या धडाकेबाज खेळीमुळे आयपीएलमध्ये चेन्नईनं हैदराबादचा पराभव केला. या विजयाबरोबरच चेन्नई आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचलं आहे. यंदाच्या मोसमातला चेन्नईचा हा चौथा विजय आहे. तर हैदराबादचा हा दुसरा पराभव आहे. पंजाब आणि चेन्नईचे पॉईंट्स बरोबर असले तरी नेट रन रेट जास्त असल्यामुळे चेन्नई पहिल्या क्रमांकावर आहे. या मॅचमध्ये हैदराबादनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. चेन्नईनं २० ओव्हरमध्ये ३ विकेट गमावून १८३ रन केल्या. हैदराबादचा कॅप्टन केन विलियमसनच्या ८४ रनच्या खेळीनंतरही हैदराबादला हे लक्ष्य गाठता आलं नाही, आणि त्यांचा ४ रननी पराभव झाला.

ब्राव्हो विजयाचा हिरो

चेन्नईच्या या विजयाचा हिरो ठरला ड्वॅन ब्राव्हो. शेवटच्या ओव्हरमध्ये ब्राव्होनं जबरदस्त बॉलिंग करून चेन्नईला विजय मिळवून दिला. या मॅचच्या शेवटच्या ओव्हरमध्ये हैदराबादला विजयासाठी १९ रनची आवश्यकता होती. पहिल्या दोन बॉलवरच ब्राव्होनं १० रन दिल्यामुळे चेन्नईच्या चिंता वाढल्या होत्या.

धोनी आला ब्राव्होच्या मदतीला

पहिल्या दोन बॉलवर १० रन दिल्यानंतर धोनी ब्राव्होच्या जवळ आला आणि त्याला रणनिती बदलायला सांगितली. मॅचनंतर धोनीनं याबाबत खुलासा केला आहे.

धोनी म्हणतो याचेच पैसे मिळतात

टीम चिंतेमध्ये असताना ब्राव्होला सल्ल्याची गरज होती. याचेच मला पैसे मिळतात असं धोनी म्हणाला. जर तुम्ही चुका केल्यात तरच तुम्हाला शिकायला मिळतं. पण अशावेळी चुका करणं टीमला परवडंत नाही, अशी प्रतिक्रिया धोनीनं दिली आहे.

धोनीकडून रायडूचंही कौतुक

या मॅचमध्ये अंबाती रायडूनं ३७ बॉलमध्ये ७९ रन केले. या खेळीमुळे त्याला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. रायडूच्या या खेळीमध्ये ४ सिक्स आणि ९ फोरचा समावेश होता. धोनीनंही रायडूच्या या खेळीचं कौतुक केलं आहे. रायडू हा शानदार खेळाडू आहे. जेव्हा तो मोठे शॉट मारतो तेव्हा आत्मविश्वासू वाटतो. रायडू कोणत्याही क्रमांकावर बॅटिंग करु शकतो, असं धोनी म्हणाला.