मुंबई : आयपीएलच्या अकराव्या मोसमाला दिमाखात सुरुवात झाली आहे. पहिल्याच मॅचमध्ये चेन्नई सुपरकिंग्जनं मुंबई इंडियन्सवर रोमहर्षक विजय मिळवला. शेवटच्या बॉलवर एक विकेट राखून चेन्नईनं मुंबईला पराभूत केलं. चेन्नईच्या या विजयाचे शिल्पकार ठरले ते ड्वॅन ब्राव्हो आणि केदार जाधव. ब्राव्होनं ३० बॉल्समध्ये ६८ रन्सची खेळी केली तर केदार जाधवनं २२ बॉल्समध्ये २४ रन्स केले.
या मॅचमध्ये बॅटिंगला आलेला केदार जाधव बॅटिंगला आलेल्या केदार जाधवच्या मांडीला दुखापत झाली. यानंतर जाधवला मैदान सोडून जावं लागलं. अखेर ९ विकेट पडल्यानंतर जाधव पुन्हा बॅटिंगला आला.
शेवटच्या ओव्हरमध्ये चेन्नईला विजयासाठी ७ रन्सची आवश्यकता होती. पण केदार जाधवला दुखापत झाल्यामुळे तो धावून एकही रन काढू शकत नव्हता. मुस्तफिजून रहमानच्या शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या तिन्ही बॉलला केदार जाधवला एकही रन काढता आली नाही. पण ओव्हरच्या चौथ्या बॉलला जाधवनं सिक्स आणि पाचव्या बॉलला फोर मारून चेन्नईला जिंकवून दिलं.
मुंबई आणि चेन्नईची मॅच सुरु असताना धोनी, रैना आणि हरभजनच्या मुली चेन्नईच्या टीमला चिअर करत होत्या. जिवा धोनीची मुलगी, ग्रेसिया सुरेश रैनाची मुलगी आणि हिनाया हरभजनची मुलगी आहे. हरभजनची पत्नी गीता बसरानं हिनाया आणि ग्रेसियाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये हिनायानं चेन्नईची जर्सी घातली आहे. वाघाच्या मुली पुढच्या सामन्याची रणनिती आखत आहेत, असं कॅप्शन गीता बसरानं या फोटोंना दिलं आहे. धोनीची मुलगी जीवाच्या इन्स्टाग्राम पेजवरूनही एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये जीवा चेन्नईची टोपी घालून टीमला सपोर्ट करत आहे.