Deepak chahar ला या दिग्गज खेळाडूनं दिली होती अशी प्रपोज करण्याची आयडिया

चेन्नई सुपर किंग्ज (CSK)चा स्टार गोलंदाज दीपक चाहरने आयपीएल 2021 च्या 53 व्या सामन्यानंतर त्याची मैत्रीण जया भारद्वाजला स्टेडियममध्ये प्रपोज केले होते.

Updated: Oct 8, 2021, 10:07 PM IST
Deepak chahar ला या दिग्गज खेळाडूनं दिली होती अशी प्रपोज करण्याची आयडिया title=

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज (CSK)चा स्टार गोलंदाज दीपक चाहरने आयपीएल 2021 च्या 53 व्या सामन्यानंतर त्याची मैत्रीण जया भारद्वाजला (Jaya bhardawaj) स्टेडियममध्ये प्रपोज केले. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यानंतर चहरने (Deepak Chahar) जयाला सर्वांसमोर गुडघ्यावर बसून अंगठी घालून प्रपोज केले. त्याने कर्णधार एम.एस धोनीच्या (Ms dhoni) सांगण्यावरून आपल्या मैत्रिणीला प्रपोज करण्याची योजना बदलली. (Dhoni Given Idea to Deepak Chahar)

दैनिक जागरणच्या बातमीनुसार, चाहरला प्लेऑफ सामन्यात जयाला प्रपोज करायचे होते, पण धोनीने त्याला प्लेऑफच्या आधी हे करण्यास सांगितले. धोनीने चहरला शेवटच्या साखळी सामन्यानंतर त्याच्या मैत्रिणीला प्रपोज करण्यास सांगितले. चहरने केवळ धोनीच्या सांगण्यावरून आपली योजना बदलली. दीपक चाहरची मंगेतर जया भारद्वाज दिल्लीची असून एका कॉर्पोरेट कंपनीत काम करते. जया प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस' सीझन 5 ची स्पर्धक सिद्धार्थ भारद्वाज (Siddharth Bhardawaj) याची बहीण आहे.

सध्याच्या आयपीएल हंगामाबद्दल बोलायचे झाले तर त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. त्याने आतापर्यंत 13 सामन्यांमध्ये 30 च्या सरासरीने 13 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी 13 धावांसह 4 विकेट्स आहे. संघासाठी सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. शार्दुल ठाकूरने 18 विकेट्स घेतल्या आहेत