पहिल्यांदाच भारतीय क्रिकेटरने मैदानावर केलं प्रपोज, सोशल मीडियावर ट्रेंड, शुभेच्छांचा वर्षाव

चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात खेळल्या गेलेल्या IPL च्या 53 व्या सामन्यात दीपक चहरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

Updated: Oct 8, 2021, 10:16 PM IST
पहिल्यांदाच भारतीय क्रिकेटरने मैदानावर केलं प्रपोज, सोशल मीडियावर ट्रेंड, शुभेच्छांचा वर्षाव title=

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात खेळल्या गेलेल्या IPL च्या 53 व्या सामन्यात पंजाबने CSK चा 6 गडी राखून पराभव केला. पण या सामन्यात दीपक चहरने (Deepak Chahar) सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या सामन्यानंतर दीपक चहरने आपल्या मैत्रिणीला स्टँडमध्ये प्रपोज (Propose to Girl) केले. हा क्षण खूप खास होता कारण चहरने ज्या मुलीला प्रपोज केले होते तिनेही सर्वांसमोर हो म्हटले. (Deepak Chahar Proposes to Girlfriend in The Stands After IPL 2021 Match)

दीपक चहरने सामन्यानंतर स्टँडमध्ये एका मुलीला प्रपोज केले. संपूर्ण जगाने हा क्षण थेट पाहिला. हा क्षण खूप खास होता कारण या अज्ञात मुलीने दीपकचा प्रस्ताव नाकारला नाही. दीपकच्या नात्याच्या बातम्या याआधीही अनेक वेळा आल्या आहेत, पण ही मुलगी कोण आहे याबद्दल कोणतीही माहिती नाही. दीपकने ज्या मुलीला प्रपोज केले होते तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Deepak Chahar (@deepak_chahar9)

दीपक चहरने या मुलीला जाहीरपणे प्रपोज केल्यावर स्टँडमध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने त्याला पाठिंबा दिला. असंच काहीसं सोशल मीडियावरही पाहायला मिळाला. लोक दीपक चहर यांचे ट्विटरवर जोरदार अभिनंदन करत आहेत आणि त्यांचे नावही सध्या ट्रेंड होत आहे. लोकांनी सोशल मीडियावर खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत.

संबधित बातमी: Deepak chahar ला या दिग्गज खेळाडूनं दिली होती अशी प्रपोज करण्याची आयडिया