Deepak Chahar : आंतरराष्ट्रीय इंडियन क्रिकेटर दीपक चाहर याच्यासोबत झोमॅटोने फसवणूक केलेली आहे, असा आरोप दीपक चाहरने केलेला आहे. दीपकने एकारात्री जेवण ऑर्डर केले होते, पण त्याला जेवणाची ऑर्डर मिळालीच नाही, परंतु दीपकला ऑर्डर मिळाल्याचा मॅसेज आला. ज्यावेळेस दीपक चाहरने झोमॅटोच्या कस्टमर केअरमध्ये तक्रार केल्यानंतर याउलट झोमॅटोनेच त्यांना खोटे ठरविले. अशी माहिती दीपक चाहरने सोशल मिडियावर (X, याआधी Twitter) पोस्टकरून दिलेली आहे.
आईपीएलच्या तयारीसाठी दीपक चाहर हा काही दिवसासांठी त्याच्या घरी आग्र्याला आलेला आहे. रविवारी रात्री दीपकने आपल्या घरी एका रेस्टॉरंटवरून जेवणाची ऑर्डर केली होती, पण तब्बल एक तासानंतरही ऑर्डर मिळाली नव्हती. यानंतर जेव्हा दीपकने कस्टमर केअरमध्ये कॉल करून तक्रार केली, तेव्हा झोमॅटोचा प्रतिनिधी त्याच्याशी उद्धटपणे बोलला आणि दीपकला खोटे ठरवून, त्याची ऑर्डर 9:31 ला डिलीवर झाली तुम्ही खोटं बोलत आहात असे म्हणत दीपकचा फोन ठेवला.
दीपक चाहरने या घटनेची पूर्ण माहिती आपल्या 'एक्स' (X) अकाऊंटवर शेअर केलेली आहे. दीपकने लिहीले, "इंडियामध्ये एक नवीन फ्रॉड आलेला आहे. झोमॅटोने माझी फसवणुक केलेली आहे. मला विश्वास आहे की, माझ्यासारखे आणखी खूप सारे लोकं असतील ज्यांना यापद्धतीच्या समस्यांना सामोरे जावे लागले असेल.
new fraud in India . Ordered food from @zomato and app shows delivered but didn’t receive anything. After calling the customer service they also said that it’s been delivered and m lying . M sure lot of people must be facing same issues. Tag @zomato and tell your story . pic.twitter.com/PwvNTcRTTj
— Deepak chahar (@deepak_chahar9) February 24, 2024
यावर झोमॅटोने दीपकला उत्तर दिलं आहे आणि लिहिले आहे की, 'नमस्कार दीपक, आम्ही तुमच्या अनुभवाबद्दल अत्यंत दुःखी आहोत. तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला क्षमस्व आहोत. तुम्ही निश्चिंत रहा, आम्ही या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन आम्ही लवकरच यावर मार्ग काढू'.
यावर दीपकने उत्तर दिलेले आहे की भुकेचे समाधान फक्त भुकेनेच होते, याची परतफेड पैश्याने होत नाही. पैसे परत दिल्याने समस्या संपत नाही.