मुंबई : सर्व जबाबदारी घेऊन आणि नियमांचं काटेकोर पालन केल्यानंतरही आयपीएलच्या 15 व्या मोसमात (Corona In IPL 2022) कोरोनाची एन्ट्री झाली आहे. विशेष म्हणजे एकाच टीममधील दुसरा सदस्य हा कोव्हिड पॉझिटिव्ह सापडला आहे. त्यामुळे या स्पर्धेचं काय होणार, असा प्रश्न हा क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. (dc ipl 2022 delhi capitals 1 player tested covid positive netizens demand to cancel 15 th season)
दिल्लीच्या फिजोयोनंतर टीममधील एका खेळाडूला कोरोना झालाय. हा पॉझिटिव्ह खेळाडू परदेशी असल्याचंही समजतंय. त्यामुळे खबरदारी म्हणून दिल्लीच्या संपूर्ण टीमला क्वारंटाईन करण्यात आलंय.
आता या पॉझिटिव्ह खेळाडूमुळे इतर खेळाडूंना काही बाधा झालीय का, हे जाणून घेण्यासाठी टीममधील सर्वांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे. सुदैवाने टीममधील सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी नेगेटिव्ह आली आहे. मात्र यानंतरही बीसीसीसआय आणखी एक टेस्ट करण्यात आल्या आहेत.
दिल्लीचा पुढील सामना पुण्यात 20 एप्रिलला पंजाब विरुद्ध सामना आहे. या सामन्यासाठी दिल्ली आज (18 एप्रिल) पुण्याच्या दिशेने रवाना होणार होती. मात्र आता संपूर्ण टीम क्वारंटाईन आहे.
आता पॉझिटिव्ह आलेल्या खेळाडूच्या कोरोना रिपोर्टची वाट पाहिली जात आहे. यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
या सर्व घडामोडीदरम्यान आता आयपीएलचा 15 वा मोसम रद्द होणार का, अशी शंका वजा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. तसेच दिल्ली विरुद्धचा होणार सामना रद्द होणार की संपूर्ण हंगामच रद्द केला केला जाणार?
बीसीसीआयने या अशा पेचात्मक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आधीच पूर्वतयारी करुन ठेवली. बीसीसीआयने काही नियम तयार केले होते. आता या नियमांची अंमलबजावणी त्या नियमांनुसार करण्यात येणार आहे. हे नियम नक्की काय आहेत, आणि या नियमांनुसार काय होऊ शकतं, हे आपण जाणून घेऊयात.
नियमानुसार, जर एखादा खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफमधील खेळाडूला कोरोना झाल्यास, त्याला 7 दिवसांसाठी विलिगीकरणात ठेवण्यात येणार आहे.
तसेच यानंतर 2 वेळा कोरोना चाचणी केली जाईल. या दोन्ही कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आल्यानंतरच संबंधित सदस्याला बायो-बबलमध्ये एन्ट्री दिली जाणार आहे.
तसेच टीममध्ये प्रवेश देण्याआधीच्या 24 तासांपूर्वी त्या खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफमधील सदस्याला काही लक्षणं नाहीत ना, तसेच त्याने काही औषधं घेतली आहेत का, याचीही पडताळणी केली जाते.
कोणत्याही एका सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये किमान 7 भारतीय आणि कमाल 4 परदेशी खेळाडूंना संधी देता येते. तसेत एका राखीव भारतीय खेळाडूही असतो. जर कोरोनामुळे टीमचं समीकरण गडबडल्यास, त्या सामन्याचं पुन्हा आयोजन केलं जाईल.
पेचात्मक परिस्थितीत सामन्याचं फेरनियोजन करणं शक्य न झाल्यास हे संपूर्ण प्रकरण आयपीएलच्या तांत्रिक विभागाकडे सोपावण्यात येईल. त्यानंतर समितीचा निर्णय हा अंतिम असतो. याआधी सामन्याच्या फेर- नियोजनाबाबत कोणताही नियम नव्हता. जर एखादी टीम सामना खेळण्साठी सक्षम नसल्यास, दोन्ही संघांना प्रत्येकी 1 पॉइंट समसमान वाटून दिले जायचे.