डेव्हिड वॉर्नरची लेक म्हणतेय...'I'm Virat Kohli'

वॉर्नरची मुलगी बॅटिग करताना...

Updated: Nov 11, 2019, 12:25 PM IST
डेव्हिड वॉर्नरची लेक म्हणतेय...'I'm Virat Kohli' title=
फोटो सौजन्य : Videograb

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने (David Warner)नुकतंच श्रीलंकाविरुद्ध झालेल्या सामन्यात धमाकेदार खेळी करत कमबॅक केला आहे. फलंदाजीमध्ये वॉर्नर जबरदस्त आहेच, पण त्याची मुलगी मात्र विराट कोहलीची चाहती असल्याचं पाहायला मिळतंय. वॉर्नरची पत्नी कन्डिस वॉर्नरने (Candice Warner)मुलीचा क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये वॉर्नरची मुलगी मी विराट कोहली असल्याचं बोलतेय.

जवळपास दीड वर्षांपूर्वी डेव्हिड वॉर्नरवर बॉल टेम्परिंग प्रकरणामुळे एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर वॉर्नरने आता पुनरागमन केलं आहे. पण, वॉर्नरची मुलगी इंडी रे हिला विराट कोहली पसंत असल्याचं दिसतंय. 

 
 
 
 

A post shared by David Warner (@davidwarner31) on

कॅन्डिस वॉर्नरने रविवारी सोशल मीडियावर मुलगी इंडी रेचा बॅटिंग करतानाचा व्हिडिओ शेअर केला. बॅटिंग करताना इंडी 'आय एम विराट कोहली' असं बोलताना दिसते. त्यानंतर इंडीने एक सुंदर शॉट खेळला. कॅन्डिसने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, या चिमुरडीने भारतात बराच वेळ घालवला आहे आणि तीला विराट कोहली बनायचं आहे, असं लिहिलंय.

  

वॉर्नर त्याच्या कुटुंबासोबत भारतात आयपीएल खेळण्यासाठी येतो आणि सामन्यादरम्यान वॉर्नरची पत्नी आणि मुलं प्रेक्षक गॅलरीतून त्यांच्या सामन्यांचा आनंद घेताना दिसतात.