मुंबई : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटर डेविड वॉर्नर (David Warner) हा साऊथ इंडस्ट्रीतला सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) याचा खुप मोठा फॅन आहे.अल्लू अर्जुनच्या पुष्पा द राईज (Pushpa The rise) सिनेमावरील गाण्यावर त्याने त्याचे अनेक इन्स्टाग्राम व्हिडिओ (Instagram Video) बनवले आहेत. हे व्हिडिओ भारतीय फॅन्सना खुप आवडले होते. मात्र आता व्हिडिओ नाही तर डेविड वॉर्नरने त्याचे कौतूक केले आहे. त्याने अल्लू अर्जुनचं कौतूक का केलंय हे जाणून घेऊयात.
डेविड वॉर्नर (David Warner) भारतीय सिनेमांचा खुप मोठा चाहता आहे. यासोबतोच तो अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) देखील खुप मोठा फॅन आहे. आयपीएल सामन्यात तो हैदराबाद संघातून खेळत असल्याने तो अल्लू अर्जून आणि या सिनेमांशी जोडला गेला. त्यामुळेच कधी कधी त्याच्यावर भारतीय सिनेमांचा आणि अल्लू अर्जूनचा फिव्हर चढतो. हा फिव्हर आपल्याला इन्स्टाग्राम रिल्सच्या माध्यमातून पाहायला मिळतो.
डेविड वॉर्नरने (David Warner) बॉलिवूड आणि अल्लू अर्जूनच्या (Allu Arjun) गाण्यावर इन्स्टा रिल्स बनवल्या आहेत. या रिल्समध्ये त्याचासोबत त्याच्या लहानशा मुली देखील नाचताना दिसल्या आहेत. त्याच्या एका पोस्टमध्ये वॉर्नरने असेही म्हटले आहे की, "काश मी अल्लू अर्जुन असतो, तो किती सहजपणे वागतो".त्याच्या या रिल्सला आणि पोस्टला भारतीय फॅन्सकडून खूप पसंती मिळते. त्यामुळे तो अशाप्रकारच्या रिल्स बनवत असतो.
दरम्यान यावेळेस तो इन्स्टाग्राम रिलमुळे नव्हे तर एका पोस्टमुळे चर्चेत आला आहे. वॉर्नरने (David Warner) सोमवारी अल्लू अर्जुनसाठी (Allu Arjun) पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने पुष्पा चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला फिल्मफेअर पुरस्कार जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले आहे. वॉर्नरने लिहिले, “हे खूप छान आहे. अल्लू अर्जुनला पुष्पा चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला होता. किती अद्भूत कामगिरी आहे आणि आम्हाला ती किती आवडली आहे. खूप छान आणि यात सहभागी असलेल्या सर्वांचे अभिनंदन. असे त्याने म्हटलेय.या त्याच्या पोस्टची खुप चर्चा आहे.