'दंगल गर्ल' गीता फोगटने खरेदी केली रेंज रोव्हर

असं म्हणतात की केलेली मेहनत कधीच वाया जात नाही. आपली नवी रेंज रोव्हर गाडी खरेदी केल्यानंतर महिला कुस्तीपटू गीता फोगटने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गाडीचा फोटो शेअर केलाय. तसेच कठोर मेहनतीचे फळ नेहमी मिळते असं तिने फोटो शेअर करताना म्हटलंय.  

Updated: Aug 22, 2017, 11:03 PM IST
'दंगल गर्ल' गीता फोगटने खरेदी केली रेंज रोव्हर title=

नवी दिल्ली : असं म्हणतात की केलेली मेहनत कधीच वाया जात नाही. आपली नवी रेंज रोव्हर गाडी खरेदी केल्यानंतर महिला कुस्तीपटू गीता फोगटने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गाडीचा फोटो शेअर केलाय. तसेच कठोर मेहनतीचे फळ नेहमी मिळते असं तिने फोटो शेअर करताना म्हटलंय.  

रेंज रोव्हर ही स्पोर्ट्स कार आहे आणि स्वत: गीता स्पोर्ट्सच्या दुनियेतील असल्याने तिने या गाडीला पसंती दिली असावी. 

गेल्या वर्षी २३ डिसेंबरला आलेला दंगल हा सिनेमा कुस्तीपटू गीता फोगट आणि बबिता फोगट यांच्या जीवनावर आधारित होता. या सिनेमाने कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडले होते. गीताने कुस्तीच्या मैदानात अनेक पदके मिळवलीत. २०१०मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिने सुवर्णपदक जिंकले होते.