विराटने शेअऱ केलेल्या व्हिडीओतील ती मुलगी कोण? घ्या जाणून

दोन दिवसांपूर्वीच भारताचा कर्णधार विराट कोहलीने चिमुरडीचा व्हिडीओ शेअर करताना तिच्या आईवडिलांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. विराटपाठोपाठ शिखर धवन, युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांनीही चिमुरडीचा हा व्हिडीओ शेअर केला होता. 

Updated: Aug 22, 2017, 08:43 PM IST
विराटने शेअऱ केलेल्या व्हिडीओतील ती मुलगी कोण? घ्या जाणून title=

नवी दिल्ली : दोन दिवसांपूर्वीच भारताचा कर्णधार विराट कोहलीने चिमुरडीचा व्हिडीओ शेअर करताना तिच्या आईवडिलांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. विराटपाठोपाठ शिखर धवन, युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांनीही चिमुरडीचा हा व्हिडीओ शेअर केला होता. 

या व्हिडीओमध्ये रडणाऱ्या चिमुरडीला पाहून विराटने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नाराजी व्यक्त केली होती. तसेच व्हिडीओत चिमुरडीला रडवणाऱ्या महिलेलाही सुनावले होते. यानंतर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. अनेकांनी तिच्या पालकांवर टीकेची झोड उठवली होती. 

या व्हायरल झालेल्या व्हिडीओतील मुलीची ओळख पटलीये. ही चिमुरडी बॉलीवूडचा गायक तोशीची तीन वर्षांची भाची आहे. हया असं तिचं नाव आहे.  हिंदुस्तान टाईम्सला तोशीने दिलेल्या मुलाखतीतून ही बाब समोर आली. 

यात तोशी म्हणाला, विराट कोहली आणि शिखर धवन यांना आमच्याबद्दल काही माहीत नाही. आम्ही आमच्या मुलांचे हित जाणतो. हयाचा स्वभाव आम्हाला माहीत आहे. तिला ओरडल्यावर ती पुढच्याच मिनिटाला ती खेळण्यासाठी पळून जाते. तिच्या या स्वभावामुळे तिला आम्ही अभ्यास करायला लावला नाही तर ती करणारच नाही. 

तसेच केवळ दीड मिनिटांचा व्हिडीओ पाहून कोणी आपल्या मुलाला कसे वागवले पाहिजे याबाबात विधान करु शकत नाही, असेही पुढे तोशी म्हणाला.