मुंंबई : कॉमनवेल्थ खेळामध्ये पी.व्ही सिंंधूवर मात करत सायना नेहवालने महिलांंच्या बॅटमिंंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. सायना नेहवालनंतर पुरूष एकेरी बॅटमिंंटन स्पर्धेमध्येही भारताला सुवर्णपदकाची आशा होती. मात्र ते हुकले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत बॅडमिंटन पुरुष एकेरीत भारताचं सुवर्णपदक थोडक्यात हुकलंय. पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या किदम्बी श्रीकांतला पराभवचा सामना करावा लागला.
#CommonwealthGames2018 #GC2018Badminton men's final: World No. 1 Kidambi Srikanth settles for silver. Goes down against Malaysia's Lee Chong Wei. Well fought Srikanth! #GC2018 pic.twitter.com/YOkkB7VW9o
— #MahanatiTeaser (@Ganeshdhonii) April 15, 2018
बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या श्रीकांतचा मलेशियाच्या ली चाँग वुईने 2-1 अशा फरकाने पराभव केला. चाँग वुईने श्रीकांतचा 21-19 , 14-21 आणि 14-21 असा पराभव केला. श्रीकांतने पहिला गेम जिंकून 21-19 अशा परकारने जिंकून सुवर्णपदाकाकडे वाटचाल केली होती. मात्र दुसऱ्या गेममध्ये लीनं दमदार पुनरागमन केलंय. ली चाँग वुईने दुसरा गेम 14-21 असा मोठ्या फरकाने जिंकत श्रीकांतवर आघाडी मिळवली. दुस-या गेममध्ये आघाडी घेतल्यानंतर चाँग वुईने तिसरा गेम सहज जिंकत सुवर्णपदकावर नाव कोरलं.