Commonwealth Games 2022 : टेबल टेनिसमध्ये सिंगापूरवर मात, भारताला 5 वं सुवर्ण

कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या पाचव्या दिवशी (Commonwealth Games 2022 Day 5) भारताची जोरदार कामगिरी सुरु आहे.

Updated: Aug 2, 2022, 09:26 PM IST
Commonwealth Games 2022 : टेबल टेनिसमध्ये सिंगापूरवर मात, भारताला 5 वं सुवर्ण title=

बर्मिंगहॅम : कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या पाचव्या दिवशी (Commonwealth Games 2022 Day 5) भारताची जोरदार कामगिरी सुरु आहे.  भारतीय महिला लॉन बॉल टीमने स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सुवर्ण पदक पटकावलं आहे. त्यानंतर आता मेन्स टीम इंडियाने टेबल टेनिसमध्ये गोल्ड मेडल पटकावलंय. भारताच या स्पर्धेतील हे पाचवं सुवर्णपदक ठरलंय. (cwc 2022 day 5 ind vs sgp table tennis final team india beat singapore and win golden medel at birmingham) 

मेन्स टीम इंडियाने टेबलटेनिसच्या फायनलमध्ये सिंगापूरचा 3-1 अशा फरकारने पराभव केला. टीम इंडियाचं कॉमनवेल्थमधील हे 21 वं टेबल टेनिस पदक ठरलंय. मेन्स टीमने पाचव्यांदा पोडियम फिनिश मिळवलंय. मेन्स इंडिया टीमची सुवर्णपदक पटकावण्याची ही तिसरी वेळ ठरलीय.

विकास ठाकूरला रौप्य (VikasThakur)

विकास ठाकूर वेटलिफ्टिंगमध्ये 96 किलो वजनी गटात एकूण 346 किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकलंय. दरम्यान वूमन्स टीम इंडियाने लॉन बॉल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच सुवर्ण पदक पटकावलंय. 

लवली चौबे, रूपाराणी टिर्की, पिंकी आणि नयनमोनी सैकिया यांनी दक्षिण आफ्रिकेचा 17-10 असा पराभव केला. भारताने आतापर्यंत एकूण 12 पदकांची कमाई केली आहे.