OMG! RCB च्या फॅनची लग्नासाठी अजब अट, 'जोपर्यंत टीम जिंकणार नाही....'

चेन्नई विरुद्ध बंगळुरू सामन्यातील एक क्षण सोशल मीडियावर चर्चाचा विषय ठरला आहे. आतापर्यंत एकदाही RCB ला आयपीएलची ट्रॉफी जिंकता आली नाही. तर चेन्नईनं 4 वेळा ट्रॉफी जिंकली आहे.  

Updated: Apr 13, 2022, 09:44 AM IST
OMG! RCB च्या फॅनची लग्नासाठी अजब अट, 'जोपर्यंत टीम जिंकणार नाही....'   title=

मुंबई : चेन्नई विरुद्ध बंगळुरू सामन्यातील एक क्षण सोशल मीडियावर चर्चाचा विषय ठरला आहे. आतापर्यंत एकदाही RCB ला आयपीएलची ट्रॉफी जिंकता आली नाही. तर चेन्नईनं 4 वेळा ट्रॉफी जिंकली आहे.  

आरसीबीचा कर्णधार फाफ ड्यु प्लेसिसने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. या सामन्यात एका महिलेचं पोस्टर खूप जास्त चर्चेत आलं. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पोस्टमध्ये असं काय लिहिलंय?
एक महिला फॅन हातात पोस्टर घेऊन मैदानात पोहोचली. जोपर्यंत RCB ट्रॉफी जिंकत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही असं या पोस्टरमध्ये लिहिलं आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

RCB ने जिंकला सामना
चेन्नईनं टीमने पाचपैकी 4 सामने गमवाले असून एक सामना जिंकला आहे. चेन्नईनं बंगळुरूसमोर मोठं धावांचं आव्हान उभं केलं पण बंगळुरूला हे आव्हान पूर्ण करता आलं नाही. चेन्नईच्या गोलंदाजांनी बंगळुरूला सामना जिंकण्यापासून रोखलं आणि 23 धावांनी विजय केला. 

सलग चार पराभवानंतर पहिल्यांदा जडेजानं विजय मिळवला आहे. बंगळुरूचा 23 धावांनी पराभव करून हा विजय मिळवला. उथप्पाने 88 तर शिवम दुबेनं 95 धावांची खेळी केली. 2022 च्या आयपीएलमध्ये चेन्नईनं पहिल्या विजयाची नोंद केली आहे.