'या' क्रिकेटपटूंनी मृत्यूही जवळून पाहिलाय....गंभीर दुर्घटनेतून वाचले स्टार क्रिकेटपटू

गंभीर दुर्घटनेतून या स्टार क्रिकेटपटूंचा वाचलाय जीव, लिस्टमध्ये भारतीय क्रिकेटपटूचंही नाव

Updated: Mar 22, 2022, 03:00 PM IST
'या' क्रिकेटपटूंनी मृत्यूही जवळून पाहिलाय....गंभीर दुर्घटनेतून वाचले स्टार क्रिकेटपटू title=

मुंबई : आयपीएलचे सामने सुरू होत आहेत. त्यानिमत्ताने आज एक खास गोष्ट जाणून घेऊया. जे खेळाडू गेम चेंजर किंवा एखाद्या टीमचा हुकमी एक्का म्हणून आहेत त्या खेळाडूंना जीवदान मिळालं आहे. काही खेळाडू असे आहेत जे मृत्यूला जवळून पाहून आले आहेत. थोडक्यात जीव वाचला आहे. आज अशा खेळाडूंबद्दल आज जाणून घेणार आहोत. 

1. मोहम्मद  शमी (भारत)

2018 मध्ये देहरादूनहून दिल्लाला येताना मोहम्मद शमीचा मोठा कार अपघात झाला होता. या अपघातात शमीच्या डोळ्यांच्या वर जखम झाली होती. काही टाके देखील शमीला पडले होते. त्यावेळी शमीची पत्नी हसीनसोबत त्याचा वाद सुरू होता. त्याने नंतर अपघातातून सावरून पुन्हा मैदानात यशस्वीपणे उतरला.

2. करुण नायर (भारत)

करुण नायरने कसोटी क्रिकेटमध्ये तीन शतक ठोकण्याचा विक्रम केला होता. सेहवागनंतर 2016 मध्ये चेन्नईकडून खेळताना त्याने हा विक्रम केला होता. त्याचवर्षी करुण नायर एका मोठ्या दुर्घटनेत सापडले.  केरळमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या करुण नायरची बोट नदीत उलटली. या भीषण दुर्घटनेतून करुण नायर वाचले, त्यांना पोहत किनाऱ्यापर्यंत यावं लागलं. स्थानिकांनी त्यांना वाचवलं मात्र आपल्या नातेवाईकांना त्यांनी या भीषण दुर्घटनेत गमवलं. 

3. ब्रूस फ्रेंच (इंग्लंड)

फेंचने आपल्या करिअरमध्ये 16 कसोटी आणि 13 वन डे सामने खेळले आहेत. हा खेळाडू एक नाही तर अनेक दुर्घटनेत सापडला आहे. 1987-88 मध्ये डोक्याला बॉल लागून दुखापत झाली होती. त्यावेळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरवाज्याजवळ पोहोचताच कार अपघात झाला. 

ब्रूसच्या डोक्यावर पुढे डॉक्टरच्या रुममधील लाईट पडली. 1985-86 मध्ये त्याला एका कुत्राने चावलं. एक नाही अशा अनेक दुर्घटना या खेळाडूसोबत घडल्या आहेत. 

4. ओशाने थॉमस (वेस्टइंडीज)

ओशाने थॉमसचा फेब्रुवारी 2020 मध्ये एक मोठा अपघात झाला होता. कार अपघातात त्याला दुखापत झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावं लागलं होतं. थॉमस लवकर रिकव्हर होऊन मैदानात परतण्यात यशस्वी ठरला होता. 

5. निकोलस पूरन (वेस्टइंडीज)

निकोलस पूरणचा 2015 मध्ये भीषण अपघात झाला होता. त्यानंतर निकोलसचं चालणंही कठीण झालं होतं. त्यानंतर रस्ते दुर्घटनेत त्याला दुखापत झाली होती. पुन्हा एकदा रुग्णालयात भरती करण्याची वेळ निकोलसवर आली. त्यानंतर निकोलस काही महिने व्हिलचेअरवर होता.