Umran Malik: "माझा रेकॉर्ड मोडता मोडता...", उमरानचा वेग पाहून अख्तरला आलं टेन्शन!

IND vs SL 2nd T20I : पावर प्लेमध्ये श्रीलंकेच्या गोलंदाजांनी तुफान फटकेबाजी केल्यानंतर कॅप्टन पांड्याने (Hardik Pandya) चहलकडे (Yuzi Chahal) बॉल सोपवला. चहलने पहिली विकेट काढून दिल्यानंतर पांड्याने आणखी एक डाव साधला.

Updated: Jan 6, 2023, 12:15 AM IST
Umran Malik: "माझा रेकॉर्ड मोडता मोडता...", उमरानचा वेग पाहून अख्तरला आलं टेन्शन! title=
Umran Malik,Shoaib Akhtar

Shoaib Akhtar On Umran Malik: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात श्रीलंकने भारताचा 16 धावांनी पराभव केला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात श्रीलंका वरचढ राहिली आणि मालिकेत 1-1 अशी बरोबर साधली. त्यानंतर आता तिसरा सामना आणखी रंगदार होईल, असं दिसतंय. दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात (IND vs SL 2nd T20I) उमरान मलिकने वेगवान गोलंदाजीनं धुमाकूळ घातला. (umran malik should take care of his bones in process of breaking my record says shoaib akhtar marathi news)

पावर प्लेमध्ये श्रीलंकेच्या गोलंदाजांनी तुफान फटकेबाजी केल्यानंतर कॅप्टन पांड्याने (Hardik Pandya) चहलकडे (Yuzi Chahal) बॉल सोपवला. चहलने पहिली विकेट काढून दिल्यानंतर पांड्याने आणखी एक डाव साधला आणि उमरान मलिकला (Umran Malik) गोलंदाजीला बोलवलं. उमरानने देखील कॅप्टनच्या विश्वासाला सार्थ ठरवत पहिल्याच बॉलवर राजपक्षेचं दांडक उडवलं. आजच्या सामन्यात उमरानने 3 महत्त्वाच्या विकेट काढल्या. त्यावर आता रावळपिंडी एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेल्या शोएब अख्तरने मोठं वक्तव्य केलंय.

आणखी वाचा - IND vs SL 2nd T20 : अक्षर लढला पण भारत हरला, श्रीलंकेने मालिकेत साधली बरोबरी!

काय म्हणाला Shoaib Akhtar?

माझ्या विश्वविक्रमाला (World Record) 20 वर्षांहून अधिक वर्षे झाली आहेत. उमरानने (Umran Malik) माझा विक्रम मोडला तर मला आनंद होईल. पण माझा विक्रम मोडता मोडता त्याने हाडे मोडून घेऊ नयेत हीच माझी प्रार्थना आहे, असं हसत हसत शोएब अख्तर (Shoaib Akhtar On Umran Malik) म्हणाला आहे.

दरम्यान, पहिल्या सामन्यात मलिकने 155 च्या वेगाने टाकलेल्या चेंडूवर श्रीलंकेचा कर्णधार दाशून शनाकाची (Dasun Shanaka) शिकार केली. हा चेंडू संपूर्ण सामन्यातील सर्वात वेगवान चेंडू होता. त्यानंतर आजच्या सामन्यात देखील उमरान मलिकचा (Umran Malik Speed) वेगवान मारा पहायला मिळाला. आगामी सामन्यात देखील त्याच्याकडून भारतीय संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.