'कोणीतरी रस्त्यावर उतरणार आहे...', घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान नताशाच्या पोस्टने खळबळ

Hardik-Natasa News : भारतीय  क्रिकेट संघाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक यांच्या घटस्फोटाच्या चर्चेने जोर धरलाय. यादरम्यान नताशाने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या एका पोस्टने खळबळ उडाली आहे. 

राजीव कासले | Updated: May 25, 2024, 05:53 PM IST
'कोणीतरी रस्त्यावर उतरणार आहे...', घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान नताशाच्या पोस्टने खळबळ title=

Natasa Stankovic Instagram Story : आयपीएलच्या सतराव्या हंगामात हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) लीग सामन्यातच बाहेर पडावं लागलं. आयपीएल हंगामाच्या सुरुवातीलाच रोहित शर्माला डच्चू देत हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण हार्दिक पांड्याच्या हाती निराशा पडली. हे कमी की काय आता हार्दिक पांड्याच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री, मॉडेल नताशा स्टेनकोविक (Natasa Stankovic) यांच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जात आहे. याची पुष्टि झालेला नाही, पण सोशल मीडियावर घटस्फोटाच्या चर्चेने वेग धरला आहे. 

हार्दिक किंवा नताशाकडून याबात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण आता नताशाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या एका पोस्टने खळबळ उडाली आहे. नताशाने आपल्या इन्स्टा स्टोरीवर एक फोटो टाकला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काय आहे नताशाची पोस्ट?
नताशा स्टेनकोविकने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात ती आपला मुलगा अगस्तबरोबर दिसत आहे. या स्टोरीला तीने एक इंग्लिश गाणं जोडलं आहे. याशिवाय तीने आणखी दोन स्टोरीज शेअर केल्या आहेत. एका स्टोरीती वर्कआऊट करताना दिसत आहे. तर दुसऱ्या स्टोरीत तीने ड्रायव्हिंगग स्कूलचं साईनबोर्ड टाकलं असून त्यावर 'आता कोणीतरी रस्त्यावर उतरणार आहे' असं लिहिलं आहे. या पोस्टवरुन सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. 

नताशाने आडनाव काढलं
रेडिटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, यात नताशाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पांड्या आडनाव हटवल्याचा दावा करण्यात आला आहे. याआधी नताशा इन्स्टाग्रामवर आपलं नाव नताशा स्टेनकोविक पांड्या असं लावत होती. पण तीने आता पांड्या आडनाव काढून टाकलं आहे. खरतर या पोस्टनंतरच हार्दिक आणि नताशाच्या घस्फोटाची चर्चा सुरु झाली.

स्टेडिअममध्येही गैरहजर
आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळली. पण यातल्या एकाही सामन्याला नताशाने स्टेडिअममध्ये हजेरी लावली नाही. नताशाने सोशल मीडियावरुन हार्दिकबरोरच्या सर्व पोस्ट हटवल्याचाही दावा केला जात आहे. 

दरम्यान, पोटगीच्या स्वरुपात नताशाला हार्दिकच्या एकूण संपत्तीपैकी 70 टक्के भाग मिळणार असल्याचा दावा सुद्धा केला जात आहे. हार्दिक आणि नताशाच्या नात्यासंदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही, किंवा या दोघांपैकी कोणीही यावर कोणतीही प्रतिक्रियासुद्धा दिलेली नाही.