T20 World Cup 2024 स्पर्धेत 20 संघ खेळणार, पहिल्यांदा 'या' देशाचा समावेश

T20 World Cup 2024 : आयसीसी टी20 विश्नचषक स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत वीस संघ सहभागी होणार आहेत. आफ्रिकेतल्या एका देशाने पहिल्यांदाच टी20 विश्वकप स्पर्धेत धडक मारली आहे. 

Updated: Nov 30, 2023, 04:32 PM IST
T20 World Cup 2024 स्पर्धेत 20 संघ खेळणार, पहिल्यांदा 'या' देशाचा समावेश title=

20 Teams in T20 World Cup 2024 : नव्या वर्षात म्हणजे 2024 मध्ये खेळवल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषकात  (T20 World Cup-2024) गुरुवारी विसाव्या संघाची एन्ट्री झाली. युगांडा (Uganda) क्रिकेट संघाने पहिल्यांदा आयसीसी स्पर्धेत (ICC Tournament) प्रवेश केला आहे. युगांडाच्या संघाने अनुभवी झिम्बाब्वे आणि केनिया संघाला पराभावाचा धक्का दिला. आयसीसी पुरुष टी20 विश्वचषकात सहभागी होणारा युगांडा हा पाचवा आफ्रिकी देश (African Country) ठरला आहे. टी20 विश्वचषक आफ्रिका क्षेत्राच्या क्वालिफाय सामन्यात युगांडाने दमदार कामगिरी केली. युगांडाने सहापैकी तब्बल पाच सामन्यात विजय मिळवला. या कामगिरीमुळे युगांडाने टॉप-2 मध्ये आपली जागा निश्चित केली. आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत युगांडा संघाचा पहिलाच प्रवेश आहे. 

युगांडाने झिम्बाब्वेवर केली मात
क्लालिफाय स्पर्धेत युगांडाने तंजानियावर मात करत विजयी सुरुवात केली. तंजानियावर तब्बल आठ विकेटने मात केली. त्यानंतर नामिबियाला युगांडाने 6 विकेटनं धुळ चारली. तर तिसऱ्या सामन्यात युगांडाने आयसीसीचा दर्जा असलेल्या झिम्बाब्वेला पाच विकेटने पराभूत केलं आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर नायजेरियाला 9 विकेटने आणि केनियाला 22 धावांनी हरवत विजयी घोडदौड सुरु ठेवली. गुरुवारी रवांडावर 9 विकेट मात करत युगांडाने टी20 विश्वचषकात क्वालीफाय करण्याचा मान पटकावला. 

युगांडाबरोबरच नामिबियानेही पुरुष टी20 विश्वचषकात प्रवेश केला आहे. नामिबियाची ही तिसरी वेळ आहे. आफ्रिका क्वालिफायर पॉईेंट टेबलमध्ये नामिबिया 10 पॉईंटस्ह टॉपवर आहे. युगांडाबरोबर नामिबियाने पाच सामने जिंकले आहेत. 

टी20 स्पर्धेत 20 संघ निश्चित
टी20 विश्वचषकात वीस संघ निश्चित झाले आहेत. भारतासह पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड आणि श्रीलंका संघाने गेल्या टी20 विश्वचषाकत टॉप-8 वर राहात स्पर्धेत क्वालिपाय केलं आहे.  वेस्टइंडिज आणि अमेरिका यजमान असल्याने त्यांची जागा निश्चित झालीय. याशिवाय अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलँड, पपुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, युगांडा, नामिबिया आणि ओमान या संघांचा समावेश आहे. 

कसा असणार स्पर्धेचा फॉर्मेट
जून 2024 च्या पहिल्या आठवड्यात टी20 विश्वचषकाला सुरुवात होईल आणि 30 जूनाल अंतिम सामना खेळवला जाणार आहे. स्पर्धेत सहभागी असलेल्या वीस संघांचे प्रत्येकी पाच प्रमाणे 4 ग्रुप बनवले जातील. प्रत्येक ग्रुपमधील टॉपला असलेला संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेलं.   पहिल्या आणि चौथ्या संघामध्ये सेमीफायनलाच पहिला सामना होईल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघामध्ये सेमीफायनलचा दुसरा सामना खेळवला जाईल. या स्पर्धेत एकूण 55 सामने खेळवले जातील.