श्रीलंकेच्या १४ बॉलर्सनी केली बॉलिंग, भारतीय खेळाडूपुढे कोणाचेही चालले नाही

टीम इंडियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी श्रीलंका टीमचा भारताबरोबर पहिला सराव सामना झाला. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 13, 2017, 08:16 PM IST
श्रीलंकेच्या १४ बॉलर्सनी केली बॉलिंग, भारतीय खेळाडूपुढे कोणाचेही चालले नाही title=

नवी दिल्ली : टीम इंडियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी श्रीलंका टीमचा भारताबरोबर पहिला सराव सामना झाला. 

बोर्ड इलेव्हनविरुद्ध सराव सामन्यात पश्चिम बंगालमध्ये जाधवपूर युनिव्हर्सिटीच्या मैदावर खेळला गेला. दोन दिवसांच्या सराव सामन्यात पहिल्यांदा श्रीलंकेने फलंदाजी केली. यावेळी जोरदार बॅटींग करत भारतीय टीमसमोर मोठे आव्हान ठेवले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी बोर्ड इलेव्हन संघाची बॅटींग कण्याची संधी मिळाली. यावेळी हा दिवस टीमचा कर्णधार संजू सॅमसन याचा राहिला.

पहिल्या दिवशी श्रीलंका खेळाडूंनी बोर्ड इलेव्हनसमोर ४११ धावांचे उद्दीष्ट ठेवले. हे उद्दीष्ट पार करताना इलेव्हन संघाने २८७ धावा केल्या. यामध्ये संजू सॅमसनने शानदार शतक केले. बोर्ड इलेव्हनचा कप्तान संजूने १४३ बॉलमध्ये १२८ धावा केल्यात.

सॅमसनने ही खेळी करताना जबरदस्त १९ चौके आणि एक षटकार ठोकला. सॅमसनचा खेळ खास ठरला कारण श्रीलंकेच्या बॉलरनी ९९ धावात ३ विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर सॅमसन हा खेळायला आला होता. त्याने चांगली फलंदाजी करत श्रीलंकेच्या गोलंदाजवर हल्लाबोल केला. एकूण १४ जणांनी बॉलिंग केली. मात्र, एकाचेही काहीही चालले नाही. केवळ विकेट कीपरने त्याला बॉलिंग केली नाही.

शेवटी बोर्ड इलेव्हनने ५ खेळाडू गमावत २८७ धावा केल्या. मात्र, तुमच्या मनात एक प्रश्न उपस्थित झाला असेल की, क्रिकेट खेळताना ११ खेळाडू असतात मग १४ जणांनी कशी बॉलिंग केली?

हा सराव सामना होता, त्यामुळे हा सामना प्रथम श्रेणीतील सामना नव्हता. कारण दोन दिवसाचा हा सामना होता. तीन किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांचा सामना असेल तर त्याला प्रथम श्रेणीचा दर्जा मिळतो. त्यामुळे दोन दिवासांच्या सामन्यात कर्णधार आपल्या टीममधील सर्व खेळाडूंना बॉलिंग देऊ शकतो. तसेच एखादा खेळाडू हा ११ खेळांडूमध्ये नसेल तरीही.