क्रिकेट जगतातील मोठी बातमी! मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली हा स्टार खेळाडू अटकेत

Match fixing: एशिया कप 2023 स्पर्धा सुरु असतानाच क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली एका स्टार खेळाडू अडचणीत सापडला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

राजीव कासले | Updated: Sep 6, 2023, 03:48 PM IST
क्रिकेट जगतातील मोठी बातमी! मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली हा स्टार खेळाडू अटकेत title=

Sachithra Senanayake Match fixing: जानेवारी 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या स्टार खेळाडूला मॅच फिक्सिंगच्या (Match Fixing) आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सचित्रा सेनानायके (Sachithra Senanayake) असं या खेळाडूचं नाव असून श्रीलंका क्रिकेट संघाचा (Sri Lanka) ता माजी खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीला वादग्रस्त बॉलिंग अॅक्शनमुळे सेनानायके चागंलचा चर्चेत आला होता. 

मॅच फिक्सिंगच्या आरोपात अटक
क्रीडा खात्याताली भ्रष्टाचार समितीने माजी क्रिकेट सचित्रा सेनानायकेला (Sachithra Senanayake) अटक केली. तीन आठवड्यांपूर्वीच न्यायालयाने त्याचा देश सोडून जाण्यावर बंदी घातली होती. 2020 मध्ये लंका प्रीमिअर लीगमध्ये मॅच फिक्स करण्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. दोन खेळाडूंना टेलिफोनवर मॅच फिक्सिंग करण्यासाठी सेनानायकेने प्रोत्साहित केलं होतं. 

सेनानायकेची क्रिकेट कारकिर्द
38 वर्षीय सचित्रा सेनानायकेने श्रीलंका क्रिकेट संघासाठी 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केलं. त्यानंतर 2016 पर्यत सेनानायके श्रीलंकेसाठी 49 एकदिवसीय आणि 24 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सेनानायकेने 53 तर टी20 क्रिकेटमध्ये 25 विकेट घेतल्या. 2014 मध्ये इंग्लंड दौऱ्यात सचित्रा सेनानायकेवर संशयास्पद बॉलिंग अॅक्शनमुळे बंदी घालण्यात आली. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात सेनानायकेने बॉलिंग करताा आपलं मनगट 15 डिग्रीहून अधिक टर्न केलं होतं. यावर आक्षेप घेत त्याच्यावर बंदी घालण्यात आली.  

दरम्यान, याआधीही क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.

2000मध्ये सर्वात मोठं फिक्सिंग
भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात मॅच फिक्सिंगचं मोठं स्कँडल घडलं होतं. याचा उलगडा भारतीय पोलिसांनी केला होता. पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे, यामध्ये टीम इंडियातील 5 खेळाडू बुकींच्या संपर्कात होते. यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हँसी क्रोनिए या प्रमुख खेळाडूंचा समावेश होता.

इंग्लंडमध्ये स्पॉट फिक्सिंग
2010 साली पाकिस्तान संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना स्पॉट फिक्सिंगची घटना घडली होती. त्यावेळी पाकिस्तान क्रिकेट टीममधील मोहम्मद आमिर, मोहम्मद आसिफ आणि तत्कालीन कर्णधार सलमान बट्ट यांचा या फिक्सिंगमध्ये समावेश होता. एका स्टिंग ऑपरेशनमुळे ही घटना समोर आली. यानंतर आयसीसीने या खेळाडूंवर काही वर्षांची बंदी घातली होती. 

आयपीएल 2013 मध्ये स्पॉट फिक्सिंग
आयपीएलचीमधली स्पॉट फिक्सिंग ही घटना तर प्रत्येक चाहत्याच्या लक्षात असेल. 2013 च्या आयपीएलच्या राजस्थान रॉयल्समधील खेळाडू एस श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंदोलिया यांना अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीला कायमचा फुलस्टॉप लागला.