ज्याच्यासाठी मोजले 8 कोटी त्यानेच वाढवलंय धोनीचं टेन्शन! पूर्ण रणजी सिझनमध्ये ठरला फ्लॉप

MS Dhoni On Sameer Rizvi : धोनीने आयपीएलसाठी घेतलेला खेळाडू सध्या रणजी ट्रॉफी खेळतोय. पण यात त्याला एकही अर्धशतक लगावता आले नाही. त्यामुळे सीएसकेचं टेन्शन वाढलंय. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 5, 2024, 01:10 PM IST
ज्याच्यासाठी मोजले 8 कोटी त्यानेच वाढवलंय धोनीचं टेन्शन! पूर्ण रणजी सिझनमध्ये ठरला फ्लॉप title=
Sameer Rizvi IPL

MS Dhoni On Sameer Rizvi : आयपीएलचा नवा हंगाम लवकरच क्रिकेटप्रेमींच्या भेटीला येणार आहे. लाखो प्रेक्षक आपल्या आवडत्या टिम्स आणि प्लेअर्सला सपोर्ट करण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएल 2024 चे ऑक्शन 19 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. यामध्ये 10 फ्रांचायजींनी सहभाग घेतला होता. यात अनेक खेळाडुंच्या नशिबाचा दरवाजा उघडला तर काहींना  खरेदी करणाराच सापडला नाही. दरम्यान ऑक्शनमध्ये धोनीने ज्या खेळाडूसाठी 8 कोटी रुपये मोजले तो खेळाडू सध्या फ्लॉप ठरताना दिसतोय. कोण आहे हा खेळाडू? त्याच्याबाबतीत सध्या काय घडतंय? जाणून घेऊया. 

धोनीने आयपीएलसाठी घेतलेला खेळाडू सध्या रणजी ट्रॉफी खेळतोय. पण यात त्याला एकही अर्धशतक लगावता आले नाही. या सिरिजमध्ये तो फ्लॉप ठरलाय. आयपीएल 2024 साठी सीएसकेने अनेक खेळाडुंना आपल्या टिममध्ये सामावून घेतले. यामध्ये उत्तरप्रदेशच्या समीर रिझवीचे नावदेखील आहे.  

आयपीएल ऑक्शनच्या आधी समीरने यूपीच्या टी-20 लीगमध्ये दमदार परफॉर्मन्स दिला होता. त्यामुळेच त्याला सीएसकेने 8.40 कोटी रुपये खर्च करुन आपल्या टीममध्ये स्थान दिले. आता रणजी ट्रॉफ 2024 मध्ये खराब खेळी करुन त्याने सीएसकेच्या स्वप्नांवर पाणी फेरलंय. 

सारखा फ्लॉप होतोय रिझवी

आयपीएल 2024 मध्ये मोठी रक्कम कमावणारा समीर रिझवी चांगला परफॉर्मन्स देईल अशी आशा आहे. दरम्यान त्याला अद्याप मोठी खेळी करता आली नाही.  त्याने आतापर्यंत 4 मॅच खेळल्या असून त्यात त्याने निराश केले आहे. केरळविरुद्ध त्याने 26, बंगालविरुद्ध त्याने 7, बिहारविरुद्ध 2 तर मुंबईविरुद्धच्या शेवटच्या मॅचमध्ये त्याने 28 आणि 2 रन्सची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे सीएसकेची निवड समिती टेन्शमध्ये आली आहे. 

विजय हजारे ट्रॉफीतही निराशा 

समीर रिझवीने यूपीच्या टीममधून विजय हजार ट्रॉफीत खेळी केली.  पण यातही तो चांगला खेळ दाखवू शकला नाही. व्हाइट बॉलच्या या टुर्नामेंटमध्ये रिझवीने शेवटच्या 5 खेळांमध्ये एकच अर्धशतक लगावले. याव्यतिरिक्त त्याची बॅट कमाल करु शकली नाही. त्याने शेवटच्या 5 खेळांमध्ये अनुक्रमे 61,43,13,10 आणि 1 असा स्कोअर केलाय. आता तो सीएसकेमधून दमदार बॅटींग करुत सर्वांना आश्चर्यचकीत करणार की येथेही फ्लॉप ठरणार? हे लवकरच समजणार आहे.