IND vs SA: रोहित शर्मा असं काय बोलला की दिनेश कार्तिक टाळ्या वाजत हसू लागला ! व्हिडिओ व्हायरल

India vs South Africa 3rd T20: इंदौररमधील T20 मालिकेतील तिसरा सामना संपल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विकेटकीपर दिनेश कार्तिक खूप हसताना दिसले. बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे.

Updated: Oct 5, 2022, 12:00 PM IST
IND vs SA: रोहित शर्मा असं काय बोलला की दिनेश कार्तिक टाळ्या वाजत हसू लागला ! व्हिडिओ व्हायरल title=

Dinesh Karthik-Rohit Sharma Laughter Video: मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या T20 सामन्यात भारतीय संघाला 49 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील संघाने तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक खूप हसताना दिसले. बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे.

रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने मालिका जिंकली

दक्षिण आफ्रिकेने मंगळवारी तिसऱ्या आणि शेवटच्या T20 सामन्यात भारताचा 49 धावांनी पराभव केला. मात्र, यजमान संघाने ही मालिका 2-1 अशी जिंकली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने सलग दुसरी T20 मालिका जिंकली. यापूर्वी त्यांनी ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव केला होता. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 3 बाद 227 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया 178 धावांवर ऑलआऊट झाली.

सामन्यानंतर बदलला रंग

कर्णधार रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांनी सामन्यानंतर चांगलीच रंगत आणली. बीसीसीआयने एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये दिनेश कार्तिक आणि रोहित एकमेकांना टाळी देत हसताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रोहित काही बोलताच कार्तिक जोरात हसतो. इतकंच नाही तर नंतर तो खूप जोरात टाळ्या वाजवतो आणि हसतो आणि नतमस्तक होतो.

कार्तिकने 219 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या

दिनेश कार्तिकने पुन्हा एकदा जोरदार शैलीत फलंदाजी केली. तो चौथ्या क्रमांकवर फलंदाजीसाठी आला आणि त्याने 219 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या. कार्तिकने 21 चेंडूत 46 धावांच्या तुफानी खेळीत चार चौकार आणि तब्बल षटकार ठोकले. तो संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला.