IND VS BAN 2nd Test Mushfiqur rahim Bold Video: कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दुसरा टेस्ट सामना खेळवला जात असून सोमवारी या सामन्याचा चौथा दिवस आहे. सोमवारी जसप्रीत बुमराहने बांगलादेशच्या मुशफिकुर रहीमला बाद करून टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं. बुमराहने आपल्या वेगवान इनस्विंग गोलंदाजीने बांग्लादेशच्या बॅट्समनला चकवून बोल्ड आउट केले. बुमराहचा हा बॉल इतका खतरनाक होता की बॅट्समनला हलायची संधीही मिळाली नाही.
41 वी ओव्हर टाकायला आलेला बुमराह त्यांच्या वेगवान गोलंदाजीने बांग्लादेशच्या बॅट्समनला सतवत होता. तेव्हा बुमराहने दुसरा बॉल टाकला तेव्हा रहीमला वाटलं बॉल पॅड जवळून निघून जाईल. रहिमला बाऊन्सचा नीट अंदाजही लावता आला नाही, त्यामुळे चेंडू थेट विकेटवर जाऊन आदळला. मुशफिकुर रहीमच्या रूपाने टीम इंडियाला चौथी विकेट मिळाली. भारताने 112 धावांवर बांगलादेशची चौथी विकेट घेतली.
BOOM! @Jaspritbumrah93 strikes early on Day 4 with a splendid delivery that comes back in sharply!
Mushfiqur Rahim departs for 11.
Live - https://t.co/JBVX2gyyPf#TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Dc4qdmt3M2
— BCCI (BCCI) September 30, 2024
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा टेस्ट सामना 27 सप्टेंबर पासून कानपुर येथे खेळवण्यात येत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. परंतु पहिल्याच दिवशी पावसाच्या आगमनामुळे केवळ 35 ओव्हर खेळवण्यात आल्या. यात भारताने बांग्लादेशच्या तीन विकेट्स घेतल्या होत्या आणि बांगलादेशने 107 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्याही दिवशी पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने खेळ एकही बॉल न खेळवता रद्द झाला तर तिसऱ्या दिवशी मैदान ओलसर असल्याने खेळ रद्द करण्यात आला.
हेही वाचा : कॅप्टन रोहितने घेतला अफलातून कॅच, पाहून कोहली आणि सिराजही झाले शॉक, पाहा Video
यशस्वी जयसवाल, रोहित शर्मा (कर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रवींद्र जड़ेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रित बुमरा, मोहम्मद सिराज
शादमान इस्लाम, जाकिर हसन, नजमुल हुसैन शान्तो (कर्णधार ), मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिट्टन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहम