Video:क्रिकेटच्या इतिहासात अशी फिल्डिंग बघितली नसेल, विकेटकिपरने पाठिवर झेलला कॅच

Viral Video : क्रिकेटच्या मैदानात अनेक कारनामे पाहिला मिळतात. काही वेळा अशक्य गोष्टीही शक्य झालेल्या पाहिला मिळतात. अशीच हैराण करणाऱ्या फिल्डिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत विकेटकिपरने चक्क पाठिवर झेल पकडला आहे. 

राजीव कासले | Updated: Nov 10, 2023, 05:28 PM IST
Video:क्रिकेटच्या इतिहासात अशी फिल्डिंग बघितली नसेल, विकेटकिपरने पाठिवर झेलला कॅच title=

Viral Video : आयसीसी विश्वचषक स्पर्धा 2023 मध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) अद्भूत, अविश्वसनीय खेळी करत ऑस्ट्रेलियाला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला. 91 धावांवर 6 विकेट असताना ग्लेन मॅक्सवेलने पॅट कमिंसच्या मदतीने दोनशे 291 धावांचं आव्हान पार केलं. विशेष म्हणजे या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलच्या एका पायात क्रॅम आला असतानाही हार न मारता तो मैदानावर भक्कमपणे उभं राहिला. क्रिकेटच्या इतिहासातला हा एक चमत्कारच होता. क्रिकेटच्या मैदानात असे अनेक चमत्कार पाहिला मिळालेत. विशेषत फिल्डिंगमध्ये असे अनेक चमत्कार पाहिला मिळतात.

अशक्य कॅच शक्य
सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ वेगाने व्हायरल (Video Viral) होतोय. या व्हिडिओत विकेटकिपरने ज्या पद्धतीने कॅच पकडला आहे क्रिकेटच्या इतिहासाच असा कॅच चाहत्यांनी कधीच पाहिला नसेल. कोणत्याही फर्स्ट क्लास, लिस्ट-ए, टी20 किंवा एकदिवसीय सामन्यात असा  कॅच पकडला (Brilliant Catch) गेला नसेल. 

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत केपीएल आणि केसीएल या दोन संघांमध्ये सामना सुरु असल्याचं पाहिला मिळतोय. लाल रंगाच्या सिझन बॉलने हा सामना खेळवला जात होता. या सामन्यात फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या विकेटकिपरने एक झेल टिपला आहे, ज्यामुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. 

पाठिवर पकडला कॅच
आतापर्यंत तुम्ही अशक्य कॅच पकडताना पाहिलं असेल. बाऊंड्रीच्या बाहेर जाऊन उडी मारत पकडलेला कॅच, हवेत उंच झेपावत टिपलेला कॅच असो की धावत पकडलेला कॅच. इतकंच काय तर कॅच विन द मॅच असंही म्हटलं जातं. पण केपीएल आणि केसीएल दरम्यानच्या या सामन्यात विकेटकिपरने चक्क पाठिवर कॅच पकडला. ऐकताना हे कसं शक्य आहे असं तुम्ही म्हणाल. पण याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यावर विश्वास ठेवावाच लागेल, केसीएलच्या इनिंगच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये डाव्या हाताचा गोलंदाजाने चेंडू टाकला. चेंडू फलंदाजाच्या बॅटला चाटून विकेट किपरच्या दिशेने गेला. 

विकेटकिपरने एका बाजूला झेपावत कॅच टिपण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा हातातून कॅच सुटला, या नादात विकेटकिपर उताणा पडला. पण आश्चर्य म्हणजे चेंडू विकेटकिपरच्या पाठिवर पडला आणि विकेटकिपरने आपल्या हाताने तो थांबलाही. क्रिकेटच्या इतिहासातला अशा प्रकारचा हा पहिलाच कॅच ठरला आहे. 

युजर्सच्या जबरदस्त कमेंट्स
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून क्रिकेट चाहते हैराण झाले आहेत. या व्हिडिओवर युजर्सने जोरदार कमेंट्स दिल्या आहेत. एका युजरने दशकातला हा सर्वोत्तम कॅच असल्याचं म्हटंलय. तर काही जणांनी विकेटकिपरच्या प्रयत्नांना दाद दिली आहे.