मालकाबरोबरचा वाद महागात पडणार? लखनऊमधून केएल राहुलचा पत्ता कट? पांड्याकडे कर्णधारपद

KL Rahul IPL 2025 : आयपीएल 2025 च्या हंगामाला बराच कालावधी असला तरी आतापासून बऱ्याच घडामोडी घडत आहेत. आता नव्या हंगामाआधी लखनऊ सुपर जायंट्सच्या कर्णधारपदावरुन केएल राहुलचा पत्ता कट होणार असल्याचं बोललं जात आहे. 

राजीव कासले | Updated: Aug 27, 2024, 04:36 PM IST
मालकाबरोबरचा वाद महागात पडणार? लखनऊमधून केएल राहुलचा पत्ता कट? पांड्याकडे कर्णधारपद title=

KL Rahul IPL 2025 : आयपीएल 2025 हंगामापूर्वी लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लखनऊ संघाच्या कर्णधारपदावरही नव्या खेळाडूची वर्णी लागणार असल्याचं बोललं जात आहे. केएल राहुलनने (KL Rahul) नुकतीच लखनऊ सुपर जायंट्स संघाचे मालक संजीव गोएंका यांची भेट घेतली होती. यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. केएल राहुलची कर्णधारपदावरुन उचलबांगडी होणार असल्याची चर्चा रंगली आहे. एका रिपोर्टनुसार लखनऊ संघाची फ्रँचाईजी केएल राहुलला रिटेन करण्याची शक्यता कमी आहे. केएल राहुलला रिलीज केल्यास लखनऊला नव्या कर्णधाराचा शोध घ्यावा लागणार आहे. 

गोएंका आणि केएल राहुल भेट
रविवारी रात्री लखनऊ संघाचे मालक संजीव गोएंका (Sanjeev Goenka) आणि केएल राहुल यांची बंगलोरमध्ये भेट झाली. या दोघांमध्ये जवळपास 1 तास बैठक सुरु होती. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती बाहेर आली नसली तरी केएल राहुलच्या लखनऊ संघातील अस्तित्वाबाबत चर्चा झाल्याचं सांगितंल जात आहे. आयपीएल 2024 मध्ये एका सामन्यात पराभवानंतर संजीव गोएंका  केएल राहुलला भर मैदानात ओरडतान दिसले होते. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गोएंका यांच्यावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतरच खर तर केएल राहुल लखनऊ संघ सोडणार याची चर्चा रंगली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केएल राहुलला लखनऊ सुपर जायंट्सचा संघ सोडायचा नाहीए, तर मालक संजीव गोएंका यांना मात्र केएल राहुलला रिलीज करायचं आहे. पण याबाबत संघाकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

लखनऊ संघाचा कर्णधार कोण?
केएल राहुलला लखनऊ संघाच्या कर्णधारपदावरुन हटवल्यास लखनऊचं सर्व लक्ष मेगा ऑक्शनवर असणार आहे. मेगा ऑक्शनमध्ये संघाकडून मोठ्या खेळाडूंवर बोली लावली जाऊ शकते. यात लखनऊची पहिली पसंती असेल ती राोहित शर्मा. मुंबई इंडियन्समधून रोहित शर्मा बाहेर पडला तर लखनऊ भरपूर पैसा खर्च करुन रोहितवर बोली लावू शकतात. याशिवाय सूर्यकुमार यादववरही संघाचं लक्ष असेल. 

कृणाल-पूरन कर्णधारपदाच्या शर्यतीत?
लखनऊ फ्रँचाईजीने अद्याप आपली रणनिती उघड केलेली नाही. केएल राहुलला हटवल्यास लखनऊ संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत कृणार पांड्या आणि निकोलस पूरन आघाडीवर असतील. खेळाडू म्हणून गेल्या दोन हंगामात कृणाल आणि पूरनने संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. कृणार आयपीएलमध्ये आतापर्यंत 127 सामने खेळला असून त्यात त्याने 1647 धावा केल्या आहेत. तर 76 विकेटही त्याच्या नावावर आहेत. तर पूरन लखनऊसाटी 76 सामने खेळला असून यात त्याने 1769 धावा केल्या आहेत.