Ind vs WI Test : वेस्ट इंडिजविरुद्ध 'हा' युवा फलंदाज करणार ओपनिंग, अशी आहे भारताची Playing XI

भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान आज पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघात युवा फलंदाजांना संधी देण्यात आली आहे. आजच्या सामन्यात रोहित शर्माबरोबर युवा फलंदाजाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 

राजीव कासले | Updated: Jul 12, 2023, 02:50 PM IST
Ind vs WI Test : वेस्ट इंडिजविरुद्ध 'हा' युवा फलंदाज करणार ओपनिंग, अशी आहे भारताची Playing XI title=

Ind vs WI Test : भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना (India vs West Indies First Test) आज डोमिनिकामध्ये (Dominika) खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरु होणार आहे. कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने  (BCCI) भारतीय संघात (Team India) अनुभवी आणि युवा खेळाडूंना संधी दिली आहे. आजच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माबरोबर (Rohit Sharma) सलामी कोण करणार याची क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता असतानाच महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विंडीज विरुद्धच्या पहिल्या सामन्यात यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) सलामीला येण्याची शक्यता वर्तवली जातेय. रोहित शर्माने यशस्वीच्या कसोटी पदार्पणावर शिक्कामोर्तब केलं आहे. 

पहिल्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने प्लेईंग इलेव्हनचं (Playin XI) चित्र स्पष्ट केलं आहे.  रोहित शर्माने दिलेल्या माहितीनुसार आयपीएलच्या सोळाव्या हंगामात दमदार कामगिरी करणारा यशस्वी जयस्वाल कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार हे जवळपास निश्चित झालं आहे. तर सलामीचा शुभमन गिल (Shubman Gil) तिसऱ्या क्रमांकावर खेळणार असल्याचं रोहित शर्माने स्पष्ट केलं.

यशस्वी जयस्वाल रोहित शर्माबरोबर भारतीय डावाची सुरुवात करेल. याशिवाय संघात गोलंदाजी करणार याबाबतही रोहित शर्माने संकेत दिले आहेत. पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात दोन फिरकी आणि तीन वेगवान गोलंदाज असतील. विकेटकिपर म्हणून ईशान किशन कि केएस भरत यांच्यापैकी कोणाला संध मिळणार याबाबत रोहितने स्पष वक्तव्य केलेलं नाही. 

ऋतुराज गायकवाड बेंचवर
भारतीय कसोटी संघात स्थान मिळालेल्या ऋतुराज गायकावडला मात्र कसोटी पदार्पणासाठी वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. या सामन्यात ऋतुराज गायकवाडला या सामन्यात बेंचवरच बसावं लागेल असे संकेत रोहित शर्माने दिले आहेत. शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकवर फलंदाजीला येईल. तर विराट कोहली आणि अजिंक्य राहाणे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करतील. त्यामुळे ऋतुराज गायकवाडला पहिल्या सामन्यात तरी संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. 

संघात किती गोलंदाज?
प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन फिरकी गोलंदाज खेळण्याची शक्यता आहे. यात अनुभवी आर अश्विन आणि अष्टपैलू रवींद्र जडेजाला संधी मिळेल. तर वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर खेळणार हे जवळपास निश्चित आहे. तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून जयदेव उनाडकट किंवा मुकेश कुमारपैकी एकाला संधी दिली जाईल. मुकेश कुमारला संधी मिळाल्यास त्याचंही हे कसोटी पदार्पण ठरेलं. 

अशी असेल प्लेईंग XI
रोहित शर्मा, यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान किशन/ केएस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, जयदेव उनादकट/मुकेश कुमार