IND vs IRE: वेस्टइंडिज नंतर टीम इंडियाचा आयर्लंडचा दौरा... वेळापत्रक जाहीर, पाहा कधी आहेत सामने

एकदिवसीय विश्व चषक स्पर्धेपूर्वी टीम इंडिया जोरदार तयारी करताना दिसत आहे. पुढच्या महिन्यात भारतीय संघ विंडिज दौऱ्यावर जाणार असून त्यानंतर आयर्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्याची तारीखही आज बीसीसीआयने जारी केली आहे.  

राजीव कासले | Updated: Jun 28, 2023, 02:12 PM IST
IND vs IRE: वेस्टइंडिज नंतर टीम इंडियाचा आयर्लंडचा दौरा... वेळापत्रक जाहीर, पाहा कधी आहेत सामने title=

India Tour of Ireland : भारतात या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक (ODI WC 2023 Scheduled) काल आयसीसीने (ICC) जाहीर केलं. 8 ऑक्टोबरपासून टीम इंडियाचं (Team India) मिशन वर्ल्ड कपला (Mission World Cup) सुरुवात होणार आहे. त्याआधी भारतीय संघ दोन देशांचे दौरे करणार आहे. पुढच्या महिन्यात भारतीय संघ वेस्ट इंडिजचा दौरा (West Indies Tour) करणार आहे. 12 जुलैपासून सुरु होणाऱ्या या दौऱ्या भारतीय संघ 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी20 सामने खेळणार आहे. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून दोन्ही मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma) नेतृत्व करणार आहे. तर टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा बाकी आहे. 

भारताचा आयर्लंड दौरा
वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर टीम इंडिया आयर्लंडचा दौरा (Ireland Tour) करणार आहे. या दौऱ्यात तीन टी20 सामने खेळले जाणार असून याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 18 ऑगस्टपासून भारताच्या आयर्लंड दौऱ्याला सुरुवात होईल. टी20 चे तीनही सामने आयर्लंडमधल्या मलाहाइड इथं खेळले जाणार आहेत. आयसीसीने ट्विट करत ही माहिती दिली आहे. यात आयसीसीने म्हटलंय, 'मलाहाइड मध्ये पार्टि करण्यासाठी को तयार आहे, ऑगस्टमध्ये आयर्लंडमध्ये 3 टी20 सामने खेळवले जाणार आहेत'.

क्रिकेट आयर्लंडचे मुख्य कार्यकारी वॉरेन ड्यूट्रोम यांनी दौऱ्याची माहिती दिली आहे. गेल्या 12 महिन्यात दुसऱ्यांदा भारतीय संघाचं आयर्लंडमध्ये स्वागत आहे, असं वॉरेने ड्यूट्रोम यांनी म्हटलं आहे. 2022 मध्ये भारत आयर्लंड दरम्यान दोन सामेने खेळवण्यात आले होते, आणि हे दोन्ही सामने हाफऊसफूल झाले होते. आता भारत आणि आयर्लंडदरम्यान तीन सामने होत असून चाहते आतुर आहेत, असं वॉरेन ड्यूट्रोम यांनी सांगितंलय. 

आयर्लंड विरुद्ध भारत टी20 सीरीज शेड्यूल
18 ऑगस्ट: पहिला टी20 (मलाहाइड)
20 ऑगस्ट: दूसरा टी20 (मलाहाइड)
23 ऑगस्ट: तीसरा टी20 (मलाहाइड)

युवा खेळाडूंना संधी?
आयर्लंड दौऱ्यासाठी संघ्यातल्या सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंची या संघात वर्णी लागू शकते. राजस्थान रॉयल्सकडून दमदार कामगिरी करणारा यशस्वी जयस्वाल (Yashaswi Jaiswal), कोलकाता नाईट रायडर्सचा आक्रमक डावखुला फलंदाज रिंकू सिंह (Rinku Singh) या खेळाडूंना आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात संधी मिळू शकते. विशेष म्हणजे या संघाच्या नेतृत्वाची धुरा मिस्टर 360 अर्थात सूर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) देण्याची शक्यता आहे.