Virat Kohli Video : टी20 वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडियाचे (Team India) सीनिअर खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली. पण आता एका महिन्याच्या सु्ट्टीनंतर दोन्ही दिग्गज मैदानावर दिसणार आहेत. श्रीलंका दौऱ्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीचा (Virat Kohli) एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. 2 ऑगस्टपासून भारत आणि श्रीलंकादरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या दौऱ्यासाठी रोहित शर्माकडे टीम इंडियाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.
विराट कोहलीबाबत खुलासा
श्रीलंका दौऱ्याआधी स्टार फलंदाज विराट कोहलीबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. विराटचा मित्र आणि टीम इंडियाचा माजी क्रिकेटर दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) याने हा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत कार्तिकने विराट कोहलीला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतात याचा गौप्यस्फोट केला आहे.
कोणते व्हिडिओ पाहातो विराट?
दिनेश कार्तिकने आपल्या मुलाखतीत विराट कोहलीला एलियन्सचे व्हिडिओ पाहायला आवडतात, प्रवासात तो सतत एलियन्सचे व्हिडिओ पाहात असतो असं कार्तिकने म्हटलंय. खरंच एलियन्स असतात का? ते कुठे राहातात? कसे दिसतात? हे जाणून घेण्यात विराट कोहलीला उत्सुकता असते, एलियन्सबाबत आपल्यालाही त्याने एकदा सांगितलं होतं, असं कार्तिकने म्हटलं आहे. विराटच्या एलियन्सबद्दल असलेल्या आवडीचा पहिल्यांचा खुलासा झाला आहे.
.@DineshKarthik reveals Virat Kohli's interest in aliens! @imVkohli #ViratKohli #ViratGang pic.twitter.com/PSv1q7jI4v
— ViratGang.in (@ViratGangIN) July 23, 2024
विराट कोहली श्रीलंका दौऱ्यात
भारत आणि श्रीलंका दौऱ्यात तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिखा खेळवली जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात टी20 मालिकेने होणार आहे. पहिला टी20 सामना 27 ऑगस्टला खेळवला जाणार आहे. तर पहिला एकदिवसीय सामना 2 ऑगस्टला रंगणार आहे. एक दिवसीय मालिकेत विराट कोहली पुन्हा एकदा खेळताना दिसणार आहे. विराटा कोहलीने श्रीलंकेत आतापर्यंत खेळलेल्या 28 एकदिवसीय सामन्यात 1028 धावा केल्या आहेत. यात पाच शतकांचा समावेश आहे.
श्रीलंका दौऱ्या विराट कोहलीने आणखी एक शतक केल्यास त्याला सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकण्याची संधी आहे. सचिननेही श्रीलंकेत पाच शतकं केली आहेत.