भारतीय क्रिकेटचं भविष्य! बीसीसीआयने निवडले 30 खेळाडू... सर्फराजच्या भावाचं नशीब उघडलं

BCCI : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने एक शिबिर आयोजित केलं आहे. यासाठी बीसीसीआयने 30 खेळाडूंची निवड केली आहे. यात श्रेयस अय्यर आणि ईशान किशनचाही समावेश करण्यात आलं असून व्ही व्ही एस लक्ष्मणच्या नेतृत्वाखाली ही शिबिर होणार आहे. 

राजीव कासले | Updated: May 20, 2024, 12:39 PM IST
भारतीय क्रिकेटचं भविष्य! बीसीसीआयने निवडले 30 खेळाडू... सर्फराजच्या भावाचं नशीब उघडलं title=

BCCI : रणजी ट्रॉफी आणि स्थानिक सामने न खेळल्याने श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि ईशान किशनला (Ishan Kishan) बीसीसीआयच्या (BCCI) सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून डच्चू देण्यात आला. बीसीसीआचे सचिव जय शाह यांनी या दोघांना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर काढण्याचा निर्णय हा चीफ सिलेक्टर अजीत आगरकर यांचा असल्याचं सांगत खळबळ उडवून दिली. यात बीसीसीआयने श्रेयस अय्यर आणि ईशान किशनला पुन्हा एक संधी दिली आहे. बीसीसीआयने श्रेयस अय्यर आणि ईशान किशनसह 30 खेळाडूंची यादी जाहीर केली आही. या खेळाडूंवर निवड समितीचं लक्ष असणार आहे. 

बीसीसीआयचं शिबिर
बीसीसीआयने  बंगळुरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत शिबिर (Cricket Camp) आयोजित केलं आहे. हे शिबिर एक महिना चालणार आहे. व्हि व्हि एस लक्ष्ण यांचं मार्गदर्शन या शिबिराला मिळणार आहे. यात श्रेयस अय्यर, ईशान किशनसह आयपीएलमध्ये लक्ष वेधून घेणारा वेगवान गोलंदाज मयंक यादव, अंडर 19 मध्ये चमकदार कामगिरी करणारा मुशीर खान, साई किशोर आणि पृथ्वी शॉसह तीस खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या खेळाडूंनी गेल्या काही काळात स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. मुंबई संघासाठी खेळणाऱ्या मुशीर खानने रणजी ट्रॉफीतही चांगली कामगिरी केली होती. मुशीर खान हा भारतीय क्रिकेटपटू सर्फराज खानचा लहान भाऊ आहे. 

अय्यर, किशनशी वाद?
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआय निवड समितीचा श्रेयस अय्यर आणि ईशान किशनवर कोणताही राग नाहीए. अय्यर मुंबईसाठी आणि ईशान किशन झारखंडसाठी स्थानिक क्रिकेट खेळल्यास आणि वर्तणुकीत सुधारणा केल्यास त्यांचा पुन्हा सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश केला जाऊ शकतो असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. इतकंच नाही तर एक महिन्याच्या शिबिरात अय्यर आणि किशनची कामगिरी चांगली राहिली तर त्यांचा टीम इंडियातही समावेश होऊ शकतो. 

याशिवाय आयपीएलच्या सतराव्या (IPL 2024) हंगामात दमदार कामगिरी करणारे हर्षित राणा,  खलिल अहमद, तुषार देशपांडे, रियान पराग, आशुतोष शर्मा यांचाही शिबिरात समावेश करण्यात आला आहे. 

या 30 खेळाडूंचा समावेश
श्रेयस अय्यर, ईशान किशन, मुशीर खान, साई किशोर, पृथ्वी शॉ, मयंक यादव, उमरान मलिक, आवेश खान, कुलदीप सेन, हर्षित राणा, खलील अहमद, तुषार देशपांडे, रियान पराग, आशुतोष शर्मा, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, शम्स मुलानी आणि तनुष कोटियां