'सचिन-द्रविडमुळे कारकिर्दीचं नुकसान'

अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव टेस्टसाठी रोहित शर्माची टीममध्ये निवड करण्यात आलेली नाही.

Updated: May 30, 2018, 08:39 PM IST
'सचिन-द्रविडमुळे कारकिर्दीचं नुकसान' title=

मुंबई : अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव टेस्टसाठी रोहित शर्माची टीममध्ये निवड करण्यात आलेली नाही. टेस्ट टीममधून वगळण्यात आल्यानंतर रोहित शर्मानं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. माझी अर्धी कारकिर्द संपली आहे. आता उरलेली कारकिर्द निवड का झाली नाही याचा विचार करण्यात घालवणार नाही, असं रोहित शर्मा म्हणाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये रोहितला संधी देण्यात आली होती. पण त्यानं निराशाजनक कामगिरी केल्यामुळे त्याला आता अफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्टमधून डच्चू देण्यात आला. टेस्टमध्ये संधी न मिळाल्याबद्दल रोहितनं भारताच्या माजी क्रिकेटपटूंनाही जबाबदार धरलं आहे.

२०१० साली मला टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी होती. पण ऐनवेळी दुखापत झाल्यामुळे मला या संधीला मुकावं लागलं. त्यानंतर थेट २०१६ साली माझं टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण झालं. या काळात टीममध्ये सचिन, द्रविड, गांगुली आणि लक्ष्मण यांच्यासारखे दिग्गज खेळाडू होते. त्यामुळे मला टेस्ट क्रिकेट खेळण्याची वाट पाहावी लागली, असं रोहित म्हणाला. २० व्या वर्षी वनडे क्रिकेट खेळल्यानंतर २६ व्या वर्षी मला टेस्ट क्रिकेट खेळायला मिळालं. एखादी संधी हुकली की किती नुकसान होतं ते मला कळलं आहे. पण प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते, त्यामुळे टेस्ट टीममध्ये स्थान मिळेल का नाही याचा विचार करणं मी सोडून दिल्याचं वक्तव्य रोहित शर्मानं केलं आहे.