गोल्ड कोस्ट : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताकडून सुवर्णपदक कमाईचा षटकार ठोकला. आज दहाव्या दिवशी ६ सुवर्ण पदाकांची कमाई केली.तर एकूण ५० पदकांची कमाई केली. भारत पदकतालिकेत तिसऱ्या क्रमांकावरकायम आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंनी पदकांचा अक्षरशः पाऊस पाडलाय. आज भारताकडून मैदानात उतरवण्यात आलेल्या खेळाडूंनी त्यांच्या त्यांच्या क्रीडा प्रकारात जबरदस्त खेळ केलाय. मेरी कोम आणि गौरव सोळंकीचा सुवर्ण ठोसा, कुस्तीत विनेश फोगाट-सुमितची सोनेरी कामगिरी तर नीरज आणि संजीव राजपूतलाही सुवर्ण पदक मिळालेय. मेरीकोमनं जबरदस्त कामगिरी करत सुवर्णपदक मिळवलं.
आजचा शनिवार भारताच्या क्रीडा क्षेत्रासाठी ख-या अर्थानं भारतीय खेळाडूंनी चांगला ठरलाय. राष्टकुल स्पर्धेत भारताचं आणखी एक सुवर्णपदक निश्चित आहे. बॅडमिंटन स्पर्धेतील अंतिम सामन्यात पी.व्ही .सिंधू आणि सायना नेहवाल आमने सामने येणार आहेत. भारताकडे आतापर्यंत २२ सुवर्णपदके मिळवलीत आहेत. 'दंगल' गिता - बबिता फोगट यांची चुकलत बहीण विनेश फोगटने ५० किलो फ्रिस्टाईल प्रकारात भारताला आणखी एका सुवर्णपदकाची कमाई करुन दिली. कॅनडाची खेळाडू आणि वर्ल्ड चॅम्पियन जेसिका मॅक्डोनाल्डला हरवत कुस्तीततलं भारताचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. रिओ ऑलिम्पीक कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिकला पुन्हा एकदा कांस्यपदक मिळालेय. तर ६० किलो वजनी गटात भारताचा बॉक्सर मनीष कुमारला रौप्यपदक पदकावर समाधान मानावे लागलेय.
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत मेरीकोमनं जबरदस्त कामगिरी करत पहिल्यांचा पदक मिळवले. तिच्या पाठोपाठ पुरुषांच्या गौरव सोळंकीनं ५२ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. तर नेमबाजीत तेजस्विनी सावंत प्रमाणेच ५० मीटर थ्री पोझिशनमधील पुरुषांच्या स्पर्धेत संजीव राजपूतनं यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील विक्रमासह सुवर्ण पदक मिळवलं. तिकडे मैदानी खेळांमध्ये नीरज चोप्रानं ८६.४७ मीटर भालाफेक करून सुवर्ण पदकावर भारताची मोहर उमटवलीय. नेमबाज संजीव राजपूतने ५० मीटर ३ रायफल पोजिशनमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. बॉक्सिंगप्रकारात गौरव सोळंकीने ५२ किलोवजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. उत्तर आयर्लंडचा ब्रेंडन इरविनचा पराभव करत गौरवने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताकडून सुवर्णपदक कमाईचा षटकार ठोकला असताना आणखी एक पदक मिळवत सात सुवर्ण पदाकांची कमाई केली. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंनी पदकांचा अक्षरशः पाऊस पाडलाय.
आज भारताकडून मैदानात उतरवण्यात आलेल्या खेळाडूंनी त्यांच्या त्यांच्या क्रीडा प्रकारात जबरदस्त खेळ केलाय. मेरी कोम आणि गौरव सोळंकीचा सुवर्ण ठोसा, कुस्तीत विनेश फोगाट-सुमितची सोनेरी कामगिरी तर नीरज आणि संजीव राजपूतलाही सुवर्ण पदक मिळालेय. मेरीकोमनं जबरदस्त कामगिरी करत सुवर्णपदक मिळवलं