Team India : ज्याची भीती होती ते घडलंच...! वेस्ट इंडिज दौऱ्यातून 'या' अनुभवी खेळाडूला डच्चू

Team India : पुढील महिन्यात टीम इंडियाला ( Team India ) वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जायचं आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टेस्ट आणि वनडे टीमची घोषणा करण्यात आलीये. मात्र यावेळी टेस्टमध्ये एका महत्त्वाच्या टीमला मोठा धक्का बसलाय. 

Updated: Jun 23, 2023, 06:41 PM IST
Team India : ज्याची भीती होती ते घडलंच...! वेस्ट इंडिज दौऱ्यातून 'या' अनुभवी खेळाडूला डच्चू title=

Team India : पुढील महिन्यात टीम इंडियाला ( Team India ) वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जायचं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर ( ICC World Test Championship ) टीम इंडियाला तब्बल एका महिन्याची सुट्टी मिळाली. 12 जुलैपासून वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात होणार असून टीम इंडियाला प्रथम टेस्ट सामना खेळायचा आहे. दरम्यान वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टेस्ट आणि वनडे टीमची घोषणा करण्यात आलीये. मात्र यावेळी टेस्टमध्ये एका महत्त्वाच्या टीमला मोठा धक्का बसलाय. हा खेलाडू दुसरा तिसरा कोणी नसून चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara ) आहे.

वेस्ट इंडिजविरूद्ध टेस्ट टीमची घोषणा करण्यात आली असून अनेक मोठे नावं या टीममधून बाहेर गेल्याचं दिसून येतंय. यामधील एक नाव म्हणजे चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara ) . 

टेस्ट टीममधून चेतेश्वर पुजाराचा पत्ता कट

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचे खेळाडू फ्लॉप झाले. काऊंटीमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या चेतेश्वर पुजारालाही ( Cheteshwar Pujara ) चांगली कामगिरी करता आली नाही. त्याच्या या खराब कामगिरीनंतर चेतेश्वर पुजाराला ( Cheteshwar Pujara ) वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टेस्ट टीममध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. 

दीर्घकाळापासून पुजारा ऑऊट ऑफ फॉर्म

बऱ्याच दिवसांपासून चेतेश्वर पुजारा आऊट ( Cheteshwar Pujara ) ऑफ फॉर्म आहे. जानेवारी 2019 पासून गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध नाबाद 102 रन्सची खेळी केली. त्यावेळी ते पुजाराचं 1443 दिवसांनंतरचं टेस्ट मधील शतक होतं. गेल्या पाच वर्षांत पुजाराच्या ( Cheteshwar Pujara ) कामगिरीत चढ-उतार दिसून आलेत. यावेळी अनुभवाच्या जोरावर त्याला संधी मिळत राहिली. मात्र यावेळी टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात त्याच्या खराब फलंदाजीमुळे त्याला टीममधून वगळण्यात आले. 

वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणारी टेस्ट टीम इंडिया

रोहित शर्मा ( कर्णधार ), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे ( उपकर्णधार ), केएस भरत ( विकेटकीपर ), इशान किशन ( विकेटकीपर ), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल , मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी