...म्हणून Shakib Al Hasan गळ्यातली दोरी चावत भारताविरुद्ध करतोय बॅटिंग; खरं कारण समोर

Shakib Al Hasan Biting A String Attached To Helmet: भारत आणि बांगलादेशदरम्यान चेन्नईमध्ये सुरु असलेल्या कसोटीमध्ये शाकीब अल हसन एक विचित्र प्रकार करताना दिसून आला.  

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 21, 2024, 03:22 PM IST
...म्हणून Shakib Al Hasan गळ्यातली दोरी चावत भारताविरुद्ध करतोय बॅटिंग; खरं कारण समोर title=
समोर आलं यामागील खरं कारण

Shakib Al Hasan Biting A String Attached To Helmet: बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसन सध्या भारत आणि बांगलादेशदरम्यानच्या सामन्यात वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. चेन्नई कसोटीमध्ये पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना शाकीबने केलेली एक कृती सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. पहिल्या डावामध्ये पाहुण्या संघातील आघाडीचे फलंदाज हजेरी लावून तंबूत परतल्याने संघाची अवस्था 36 वर 4 बाद अशी झाली. त्यावेळी पडझड थांबवण्याच्या आणि डावाला आकार देण्याच्या दबावाखालीच शाकीब मैदानात उतरला. सामान्यपणे आक्रमकपणे फलंदाजी करणाऱ्या या खेळाडूच्या एका कृतीने भारतीय चाहत्यांचंही लक्ष वेधलं. मैदानात आल्यानंतर शाकीब त्याच्या हेल्मेटमध्ये एका बाजूला लटकत असलेला दोरासारखा तुकडा चावताना दिसला. 

नेमकं काय सुरु होतं मैदानात?

शाकीब हेल्मेटमध्ये दोरी किंवा कापडाच्या पट्टीसारखा दिसणारा हा तुकडा दाताने चावत असल्याचं कॅमेरांनी लगेच टीपलं. अगदी झूम करुन शाकीब काय करतोय दे दाखवण्यात आला. पाहात पाहात हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेक चाहत्यांनी शाकीब असं का करतोय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत वेगवेगळे तर्क मांडले. ही शाकीबची सवय आहे की तणावामध्ये खेळताना त्याच्याकडून अनावधानाने ही कृती होत होती याबद्दल चर्चा सुरु आहे. अनेकांनी तो गळ्यातील दोरा चावत असल्याचं म्हटलं तर काहींनी याचा शाकीबच्या मनातील काही अंधश्रद्धेशी संबंध असू शकतो असंही म्हटलं.

काहींना हा प्रकार किसळवाणा वाटला, तर काहींनी असते प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत म्हणून याकडे दूर्लक्ष केलं. खाली पाहा काही क्रिकेट चाहत्यांच्या प्रतिक्रिया...

1)

2)

3)

खरं कारण काय?

सामन्याच्या लाइव्ह टेलिकास्टदरम्यान भारताचा माजी विकेटकीपर बॅट्समन दिनेश कार्तिकने यासंदर्भातील खरं कारण सांगितलं. कार्तिकने दिलेल्या माहितीनुसार, या मालिकेसाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये त्याच्याबरोबर बंगलादेशचा तामीम इक्बाल होता. त्याने शाकीबच्या गळ्यातील हा दोरा त्याला फलंदाजी करताना योग्य पोझिशनमध्ये उभं राहण्यासाठी मदत करतो असं आपल्याला सांगितल्याचं कार्तिकने म्हटलं. शाकीब या गळ्यातील दोऱ्याचा वापर सेल्फ-चेक मॅकॅनिझमसारखा करतो. या दोऱ्यामुळे त्याला त्याचं डोकं फलंदाजी करताना स्थिर ठेवता येतं. हा दोरा चावत राहिल्यास शाकीबला त्याचं डोकं लेग साईडला करायचं नाही याची जाणीव राहते.

या गळ्यातील दोऱ्याचं हेल्मेटशी कनेक्शन असून तो दातात पकडून ठेवल्याने डोकं एका बाजूला झुकत असेल तर त्याची जाणीव शाकीबला होते. त्यामुळे तो फलंदाजी करताना डोकं जास्तीत जास्त सरळ ठेवण्यासाठी हा दोरा चावताना दिसतो.