मुंबई : आयपीएलचे सामने 26 मार्चपासून सुरू होणार आहेत. पहिला सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता आहे. या सामन्यापूर्वी महेंद्रसिंह धोनी आणि CSK टीमचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे. दीपक चाहरला दुखापत झाली आहे. त्यामुळे आता तो IPL 2022 खेळणार की नाही याबाबत अजूनही शंका आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध शेवटच्या टी 20 सामन्यात दीपक चाहर जखमी झाला आहे. तो खेळणार की नाही याबाबत अजूनही शंका आहे. त्यामुळे CSK च्या चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे. आलेल्या रिपोर्टनुसार आयपीएलचे काही सामने दीपक खेळू शकणार नाही. पण अद्याप यावर कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
आकाश चोपडा, डेनियल विट्टोरी आणि वसीम जाफर यांनी दीपक चाहरवर सविस्तर चर्चा केली आहे. दीपक चाहर जर पूर्ण बरा झाला नाही तर तो आयपीएल 2022 खेळू शकणार नाही. त्याच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून कोणाला घेण्यात येऊ शकतं यावरही चर्चा झाली आहे.
दीपक चाहर जर संघातून बाहेर गेला तर तो खूप मोठा CSK ला धक्का असणार आहे. दीपक चाहर न खेळणं हे खूप मोठं नुकसानकारक असणार आहे. आकाश चोपडाच्या मते, दीपक चाहरला एडम मिल्नेसोबत रिप्लेस केलं जाणाची शक्यता आहे. तो घातक गोलंदाज आहे. त्याचा फायदा चेन्नई संघाला होऊ शकतो.
दीपक चाहर संघात कधी परतणार? तो खरंच आयपीएलचे सामने खेळणार की संघातून बाहेर जाणार? याबाबत CSK कडून कधी घोषणा होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. आयपीएलचे सामने 26 मार्चपासून सुरू होणार आहेत.