चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ : विराटने दोस्ती निभावली, डिविलिअर्सनंतर विराट शून्यावर बाद

 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत आज सुरू असलेल्या भारत वि. श्रीलंका सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली शुन्यावर बाद झाला, त्यानंतर सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिभेला धुमारे फुटले. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 8, 2017, 07:34 PM IST
 चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ :  विराटने दोस्ती निभावली, डिविलिअर्सनंतर विराट शून्यावर बाद  title=

नवी दिल्ली :  आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत आज सुरू असलेल्या भारत वि. श्रीलंका सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली शुन्यावर बाद झाला, त्यानंतर सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिभेला धुमारे फुटले. 

कोहली झिरोवर बाद झाल्यावर सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यास सुरूवात झाली, ट्विटरवर लोक म्हटले की कोहलीने दोस्ती निभावली आहे.  बुधवारी साऊथ आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलिअर्सही पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात झिरोवर बाद झाला. तो वन डे मध्ये पहिल्यांदा पहिल्या चेंडूवर शुन्यावर बाद (गोल्डन डक) झाला होता. 

पाहा काय आहे ट्विटरवर ट्रोल 

 

विशेष म्हणजे विराट कोहली आणि एबी डिव्हिलिअर्स आयपीएलमधून एकाच संघाकडून म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळतात. दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. आयपीएलमध्ये दोघांचा संघ चांगली कामगिरी करू शकला नव्हता. या सिझनमध्ये विराट आणि डिव्हिलिअर्स दोन्ही फ्लॉप ठरले आहेत.