कॅप्टन कूल MS Dhoni इन्स्टाग्रामवर फक्त एवढ्याच लोकांना फॉलो करतो

कॅप्टन कूल माही कोणत्या तीन लोकांना फॉलो करतो? काय आहे नेमकं यामागे कारण

Updated: May 15, 2021, 02:54 PM IST
कॅप्टन कूल MS Dhoni इन्स्टाग्रामवर फक्त एवढ्याच लोकांना फॉलो करतो  title=

मुंबई: महेंद्रसिंह धोनी हा सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आपल्या फलंदाजीसाठी तर प्रसिद्ध आहेच पण आपल्याला हवा तसा हव्या त्या पद्धतीनं सामना फिरवण्याची कलाही धोनीमध्ये आहे. त्यामुळे धोनीला एक यशस्वी कर्णधार म्हणूनही ओळखलं जातं. महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर चाहते आणि क्रिकेटप्रेमी खूप भावुक झाले होते. 

महेंद्रसिंह धोनीला सोशल मीडियावर फारसा वेळ घालवणं पसंत नाही. त्याने फेब्रुवारी 2020मध्ये शेवटचा फोटो ट्वीटरवर अपलोड करून ट्वीटरलाही बायबाय म्हटलं होतं. हा शेवटचा फोटो वाघाचा अपलोड केला होता. त्यानंतर धोनी काही प्रमाणात इन्स्टावर आले मात्र तिथेही जास्त वेळ घालवणं त्यांना पसंत नव्हतं. 

सर्वात महत्त्वाचं म्हणजे जगभरात धोनीचे चाहते असलेल्या माहीने इन्स्टाग्रामवर केवळ तीनच लोकांना फॉलो केलं आहे. सर्वात जास्त आश्चर्य तेव्हा वाटेल जेव्हा तीन लोकांपैकी एक सेलिब्रिटी आणि दोन कुटुंबातील लोक आहेत. 

ती क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्न करण्यास उत्सुक होती, कोहलीनेच सांगितला किस्सा

साक्षी आणि मुलगी जीवा या दोघांसोबतच बॉलिवूडचे सुपरस्टार महानायक अमिताभ बच्चन यांना माहीने फॉलो केलं आहे. माहीचे टीममधील खेळाडूसोबत मैदानातच नाही तर मैदानाबाहेरही खूप खास नातं आहे. असं असतानाही फक्त बिग बींचीच निवड का केली याचाही एक खास किस्सा आहे. 

अमिताभ बच्चन यांनी 2011मध्ये वर्ल्डकप जिंकल्यानंतर धोनीला अभिनंदन करण्यासाठी खूप मेसेज आणि फोन केले. मात्र त्याचा रिप्लाय धोनीने दिला नाही. काही काळानंतर जेव्हा दोघे एका समारंभात आमनेसामने आले तेव्हा बिग बी यांनी धोनी याबाबत विचारले. 

जहीर खानची टीम इंडियात निवड या माजी खेळाडूच्या एका फोनवर - सौरव गांगुली

धोनी म्हणाला की, मला वाटलं की कोणीतरी अमिताभ बच्चन यांच्या नावे मला फोन आणि मेसेज करत आहे. म्हणून मी त्याला कोणताही रिप्लाय दिला नाही. तेव्हापासून माहीने महानायक अमिताभ यांचा सन्मान करत त्यांना इन्स्टावर फॉलो केलं. याचं कारण म्हणजे दुसऱ्यांदा अशी कोणतीही तक्रार येणार नाही याची काळजी घेतली. 

महेंद्र सिंह धोनीला फोन सोबत जास्त वेळ घालवणं आवडत नाही. तो दरवेळी फोन आपल्यासोबत ठेवतोच असं नाही आणि फोन जवळ असला तरी दरवेळी फोन उचलतोच असंही नाही. व्ही व्ही एस लक्ष्मण जेव्हा संन्यास घेत होते तेव्हा ही बातमी देखील कॅप्टन कूल धोनीला पहिली सांगायची होती. मात्र धोनीने त्यांचाही फोन उचलला नव्हता.