केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाची क्रिकेटमध्ये एन्ट्री

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाचं क्रिकेटमध्ये एन्ट्री झाली आहे. 

Updated: Apr 4, 2022, 08:56 PM IST
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाची क्रिकेटमध्ये एन्ट्री  title=

मुंबई : केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री आणि भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मुलाने क्रिकेटमध्ये एन्ट्री केली आहे. ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia)  यांचा मुलगा महाआर्यमन शिंदेची (Jyotiraditya Scindia Son Name)  रविवारी ग्वाल्हेर डीव्हीजन क्रिकेट असोसिएशनच्या (GDCA) उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जीडीसीएच्या अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली. (cabinet minister jyotiraditya shinde son mahaaryaman shinde appointed vice president of gwalior division cricket association)

GDCA च्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण वार्षिक बैठकीनंतर महाआर्यमनची कार्यकारी समितीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी आयएएस अधिकारी प्रशांत मेहता यांची असोसिएशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचं जीडीसीएचे सचिव संजय आहुजा यांनी सांगितलं.

शिंदे कुटुंबियांचं क्रिकेट कनेक्शन

महाआर्यमनचे वडील ज्योतिरादित्य आणि आजोबा माधवराव शिंदे यांचं क्रिकेटशी जवळचं नातं राहिलं आहे. ज्योतिरादित्य शिंदे सध्या ग्वाल्हेर डिव्हिजन क्रिकेट असोसिएशनचे संरक्षक आहेत.

त्यांनी मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपदही भूषवलं आहे. काही दिवसांपूर्वी महाआर्यमनने वडिलांसह पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सिंधिया यांच्या घरी गेले होते. 

काँग्रेसचे माजी नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी 2020 मध्ये भाजप प्रेवश केला होता. ज्योतिरादित्य यांची गेल्या वर्षी मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आले होते.