नवी दिल्ली : क्रिकेटचं मैदान गाजवणारा आणि क्रीडारसिकांच्या मनावर अधिराज्य करणारा विराट कोहली (Virat Kohli) हा व्यवसाय क्षेत्रातही तितकाच यशस्वी असल्याचं पाहायला मिळत आहे. फेअरफॅक्स प्रमोटेड डिजिट इंश्युरन्सनं सध्याच्या घडीला, फेअरिंग कॅपिटल आणि नवे गुंतवणुकदार सिकोइया कॅपिटल, आयएफएल अल्टरनेट असेट मॅनेजर्स आणि इतर रुपांमध्ये तब्बल 200 मिलियन डॉलर इतकी कमाई केली आहे.
अवघ्या काही वर्षांपूर्वीच सुरु झालेल्या या कंपनीची किंमत आता 3.5 बिलियन डॉलरच्या घरात पोहोचली आहे. जानेवारीमध्ये झालेल्या गुंतवणुकीनंतर ही किंमत आता दुपटीनं वाढल्याची बाब समोर आली आहे. या कंपनीधम्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार, विराट कोहली याचीही भागिदारी आहे.
2017 मध्ये झाली होती सुरुवात
डिसेंबर 2017 मध्ये सुरु झालेल्या ‘डिजिट इंश्युरंस’ या कंपनीनं पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार 2021 या आर्थिक वर्षामध्ये कंपनीच्या उत्पन्नाचा आकडा 44 टक्क्यांनी वाढून 3243 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यामध्ये 123 कोटींचा निव्वळ नफा कंपनीला झाला आहे. नफ्याचा हा आकडा मोठा वाटत असला तरीही निर्धारित लक्ष्यापेक्षा मात्र तो कमी असून, कोरोना संसर्गाचाच यावर परिणाम झाला आहे, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. 200 मिलिय़न डॉलर ही कंपनीची आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणुक ठरत आहे.
झहीरच्या Wedding Party मध्ये विराटनं अनुष्कासोबत असं काही केलं की....
कंपनीतील इतर गुंतवणुकदार कोण?
डिजिट इंन्शुरन्स ही कंपनी ट्रॅव्हल आणि ऑटो या क्षेत्रांमध्ये इंन्श्युरन्सची सुविधा पुरवते. या कंपनीमध्ये असणाऱ्या गुंतवणुकदारांमध्ये टीव्हीएस कॅपिटल फंड्स, A91 पार्टनर्स, क्रिकेटरपटू विराट कोहली आणि इतरांचा समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार डिजिटच्या ग्राहकांची संख्या 2 कोटींच्या घरात आहे. तर, आतापर्यंत कंपनीनं 5 लाख क्लेम्स पूर्णही केले आहेत.