सामन्यादरम्यान खेळाडूचं निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

क्रीडा विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे.  लाईव्ह सामन्यादरम्यान खेळाडूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. 

Updated: May 19, 2022, 08:03 PM IST
सामन्यादरम्यान खेळाडूचं निधन, क्रीडा विश्वावर शोककळा title=

मुंबई : क्रीडा विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे.  लाईव्ह सामन्यादरम्यान खेळाडूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. यामुळे क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे.  जर्मनीचा प्रसिद्ध बॉक्सर मुसा यमकचा (Musa Yamak) सामन्यादरम्यान मृत्यू झाला. विशेष आणि उल्लेखनीय बाब म्हणजे मुसा आपल्या बॉक्सिंग कारकिर्दीत एकही सामन्यात पराभूत झाला नव्हता. (boxer musa yamak died due to heart attack during to live match video viral on social media) 
 
मुसाच्या मृत्यूमागील कारणाने सर्वांनाच हादरवून सोडलंय. मुसाचा मृत्यू सामन्यात जास्त मार खालल्यामुळे नाही, तर हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. मुसा 38 वर्षांचा होता. मुसाला याआधी 14 मे ला सामन्यादरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता.

व्हीडिओ व्हायरल

मुसाच्या मृत्यूच्या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हीडीओत मुसा आपल्या प्रतिस्पर्धी बॉक्सरशी लढत असताना अचानक खाली पडल्याचे दिसून येतं. यानंतर काय झालं हे पाहण्यासाठी रिंगच्या आत मेडिकल टीम जाते. मुसाची वैद्यकीय पथक उचलून उपचारासाठी घेऊन जाते. 

नक्की काय झालं? 

युरोपियन आणि एशियन चॅम्पियनशिपचा विजेता बॉक्सर मुसा आणि युगांडाचा हमजा वांडेरा यांच्यात सामना सुरू होता. सामन्यादरम्यान, दुसऱ्या फेरीत वंडेराने मुसाला जोरदार ठोसा दिला. यानंतर, तिसऱ्या फेरीच्या आधी, मुसा रिंगमध्ये पडला. मुसा पडल्यानंतर काही उठलाच नाही. 

नक्की काय झालंय, हे पाहण्यासाठी एकच गर्दी झाली. मुसाला पडलेल्या स्थितीत पाहताच तेथे उपस्थित असलेल्या सामनाधिकारी त्याच्यापर्यंत पोहोचले आणि त्याला रुग्णालयात दाखल केलं. तिथं डॉक्टरांनी मुसाला मृत घोषित केलं.