Border Gavaskar Trophy Fastest Ball In Cricket History: अॅडलेडच्या मैदानावर बॉर्डर-गावस्कर चषक स्पर्धेमध्ये सध्या दुसरी कसोटी खेळवली जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवल्या जात असलेल्या या कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघ तंबूत परतल्याने भारतीय संघाने अर्धा दिवस गोलंदाजी केली. या दिवस-रात्र खेळवण्यात येणाऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारताच्या मोहम्मद सिराजने एकूण 10 ओव्हर टाकल्या. मात्र त्याला पहिल्या दिवशी एकही विकेट घेता आली नाही. मात्र पहिल्या दिवशीची खेळ संपल्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर एका वेगळ्याच कारणामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला. त्यासंदर्भातील अनेक मिम्स सोशल मीडियावर पोस्ट झाले. नेमकं घडलं काय ते पाहूयात...
झालं असं की, सिराजच्या गोलंदाजीचा वेग पाहून अनेकांना घाम फुटला. विशेष म्हणजे यासाठी कौतुक होण्याऐवजी तो ट्रोल झाला आहे. पण नक्की तो ट्रोल का झाला हे जाणून घेणं अधिक रंजक आहे कारण त्याच्या गोलंदाजीचा वेग पाहून मिम्सचा पाऊस पडलाय. या मिम्समध्ये वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम असलेल्या शोएब अख्तरचाही अनेकदा आवर्जून उल्लेख भारतीयांनी केल्याने तो ही ट्रेण्डमध्ये होता.
बॉर्डर-गावस्कर चषक ब्रॉडकास्ट करणाऱ्या 'फॉक्स स्पोर्ट्स' या परदेशी ब्रॉकास्टर्सने गोंधळ घातल्याने ऑस्ट्रेलियन संघाच्या फलंदाजीदरम्यान 25 व्या ओव्हरमध्ये भलतेच चित्र स्क्रीनवर दिसले. सिराज गोलंदाजी करत असताना त्याने चक्के 181.6 किलोमीटर प्रतितास वेगाने चेंडू टाकल्याचं स्पीडगनच्या रिडींगने दाखवल्याचं स्क्रीनच्या तळाशी झळकलं. सिराज 25 वी ओव्हर मार्कस लॅबुशेनला गोलंदाजी करत असतानाच ओव्हरचा शेवटचा बॉल 181.6 किलोमीटर प्रतितास वेगाने टाकण्यात आल्याचं स्क्रीनवर दिसलं आणि हे पाहून अनेकांनी हा स्क्रीनशॉट व्हायरल केला.
1)
Shoib akhtar : I’m fastest 160 km/hr
Dsp Siraj be like: mai 181 fekugaaa.#DSPSiraj pic.twitter.com/kYxppcjeut— (@otanime_) December 6, 2024
2)
DSP Siraj bowled the fastest delivery in cricket 181.6 Km/H
After Viv Richards, he is coming to eat Shoaib Akhtar's legacy.#DSPSiraj #Siraj #JaspritBumrah #INDvsAUS #AUSvsIND #AUSvIND #KLRahul #ViratKohli pic.twitter.com/wDY3xNc1SD
— Monish (@Monish09cric) December 6, 2024
3)
Mohammed Siraj clocked at 181.6 km/h that last ball. Tell me the beer snake didn’t fire him up pic.twitter.com/kSzV64F6It
— Ethan (@ethanmeldrum_) December 6, 2024
4)
Siraj bowled 181 km/hr .... fox is high pic.twitter.com/vrRsSsW25d
— Kifayat Malik (@KifayatMalik176) December 6, 2024
5)
Greatest Batsman + Bowler to ever exist on Planet Earth 181.6 KM/H
DSP Mohammed Bradman Siraj Akhtar pic.twitter.com/mZaHsAFzuq— Dhillon (@sehajdhillon_) December 6, 2024
आयसीसी वर्ल्ड कप 2003 च्या स्पर्धेमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात शोएब अख्तरने 161.3 किलोमीटर प्रतितास वेगाने टाकलेला चेंडू हा क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू आहे.