Vinesh Phogat: भारताच्या मिशन ऑलिम्पिकला (Mission Olympic) मोठा धक्का बसला आहे. भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलं आहे. मंगळवारी रात्री 50 किलो वर्गात फ्रीस्टाइलसाठी तिचा आज अंतिम सामना रंगणार होता. मात्र त्यापूर्वी तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आल्याने तिला अपात्र ठरवण्यात आलं आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावं लागतं.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री तिचं वजन 2 किलो जास्त असल्याचं समोर आलं. हे वजन कमी करण्यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली. मात्र अखेरीस तिची सगळी मेहनत पाण्यात गेली आहे. सेमीफायनलचा सामना जिंकताना तिचं वजन 52 किलो इतकं होतं आणि त्यानंतर तिचे २ किलो वजन कमी करण्यासाठी तिने रक्तही काढले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विनेश फोगटने सेमीफायनलमध्ये विजय मिळवल्यानंतर अजिबात आराम केला नाही. तिने रात्रभर जागून तिचं अतिरिक्त वजन कमी करण्याचा खूप प्रयत्न केला. स्पोर्ट्स स्टारच्या रिपोर्टनुसार, विनेश फोगटने वजन कमी करण्यासाठी सायकल चालवली, तिने दोरीच्या उड्याही मारला. एवढंच नाही तर विनेशने तिचे केस आणि नखेही कापलं. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तिने तिच्या शरीरातून रक्तही काढलं होतं. परंतु असं असूनही तिचं वजन केवळ 50 किलो 150 ग्रॅम झालं.
कुस्तीमध्ये, कोणत्याही कुस्तीपटूला फक्त 100 ग्रॅम जास्त वजनाची सूट मिळते. त्यामुळे विनेशचे वजन 50 किलो किंवा 100 ग्रॅम असतं तर ती गोल्ड मेडलची लढत खेळू शकली असती, पण तिचे वजन 50 ग्रॅम जास्त होतं आणि त्यामुळे तिचे ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न भंगलं. कुस्तीमध्ये कुस्तीच्या सामन्यांपूर्वी प्रत्येक खेळाडूचं वजन केलं जातं. याशिवाय कुस्तीपटूला त्याच श्रेणीत आपलं वजन 2 दिवस राखायचं असतं, परंतु विनेशला तसं करता आलं नाही.
अपात्र ठरल्यानंतर आता विनेश बेशुद्ध झाल्याचं समोर आलं आहे. विनेशला पॅरिसच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिला IV फ्लुइड देण्याची शिफारस करण्यात आली आहे. डिहायड्रेशनमुळे विनेशला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार विनेश आता ऑलिम्पक व्हिलेजच्या पॉलिक्लिनिकमध्ये आहे. तिची तब्येत आता स्थिर असल्याचं तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.