दुष्काळात तेरावा महिना! टॉप फोरच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या मुंबई इंडियन्सला आणखी एक धक्का

आयपीएलचा यंदाचा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी फारसा चांगला ठरत नसतानाच आता आणखी एक धक्का

Updated: May 9, 2022, 08:09 PM IST
दुष्काळात तेरावा महिना! टॉप फोरच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या मुंबई इंडियन्सला आणखी एक धक्का title=

IPL 2022 : आयपीएलचा पंधरावा हंगाम पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) फारसा चांगला राहिलेला नाही. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सला केवळ दोन सामने जिंकता आले आहेत, तर तब्बल 8 सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे पॉईंटटेबलमध्येही (Point Table) मुंबई इंडियन्स तळाला आहे.

आयपीएलमधल्या टॉप फोरच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स आधीच बाहेर पडली आहे. त्यातच आता संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्सचा प्रमुख खेळाडू आयपीएलमधून (IPL) बाहेर पडला आहे. 

मुंबई इंडियन्सचा मॅच विनर फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) दुखापतग्रस्त झाला आहे. सूर्यकुमारच्या डाव्या हाताला दुखापत झाली असून मुंबई इंडियन्सच्या उर्वरित सामन्यात तो खेळू शकणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार सूर्यकुमारच्या मनगटाला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो आयपीएलमधून बाहेर पडला आहे. बीसीसीआयच्या (BCCI) वैद्यकीय पथकाशी चर्चा झाल्यानतंर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

दुखापतीमुळे सूर्यकुमार सुरुवातीचे दोन सामनेही खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीचा मुंबई इंडियन्सला चांगलाच फटका बसला. सूर्यकुमार यादवची आयपीएल 2022 मधली कामगिरी दमदार झाली आहे. आतापर्यंत झालेल्या आठ सामन्यात सूर्यकूमारने 43 च्या अॅव्हरेजने 303 धावा केल्या आहेत. यात 3 हाफसेंच्युरीचा समावेश आहे. 

आयपीएलनंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेबरोबर दोन हात करणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधात 5 टी-20 सामने खेळणार आहे. या मालिकेत बड्या क्रिकेटर्सना आराम दिला जाण्याची शक्यता आहे.