Ind Vs Aus: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी टीमला 2 मोठे धक्के; दुखापतीमुळे मॅचविनर्स खेळाडू बाहेर

भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus:) यांच्यामध्ये 4 सामन्यांची सिरीज खेळवली जाणार आहे. 9 फेब्रुवारीपासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy) सुरुवात होणार आहे.

Updated: Feb 5, 2023, 02:12 PM IST
Ind Vs Aus: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी टीमला 2 मोठे धक्के; दुखापतीमुळे मॅचविनर्स खेळाडू बाहेर title=

Ind Vs Aus: भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus:) यांच्यामध्ये 4 सामन्यांची सिरीज खेळवली जाणार आहे. 9 फेब्रुवारीपासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy) सुरुवात होणार आहे. दरम्यान सिरीज सुरु होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलिया टीमसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या पहिल्या टेस्ट सामन्यातून भारताचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड (Josh Hazlewood) बाहेर झाला आहे.

एका रिपोर्टनुसार, जोश हेझलवूड अजून पूर्णपणे त्याच्या दुखापतीतून बरा झालेला नाही. त्यामुळे तो पहिल्या टेस्ट सामन्यातून बाहेर होऊ शकतो. याशिवाय दिल्लीमध्ये होणाऱ्या टेस्ट सामन्यात देखील त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. जोशने प्रॅक्टिस सामन्यामध्ये देखील भाग घेतला नाही. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यामध्ये जोश हेझलवूडच्या जागी स्कॉट बोलँडचा समावेश केला जाऊ शकतो. 

ऑस्ट्रेलियासाठी अजून एक वाईट बातमी

इतकंच नाही तर ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमला दुसरा एक मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे मिचेल स्टार्क देखील पहिल्या टेस्ट सामन्यामधून बाहेर पडला आहे. हे दोन्ही गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या टीमचा मुख्य कणा मानले जातात. त्यामुळे टीममध्ये त्या दोघांचा समावेश नसणं हे ऑस्ट्रेलियासाठी मोठं संकट असू शकतं. 

ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या 2 टेस्टसाठी भारताची टीम 

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मो. शमी, मो. सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट, सूर्यकुमार यादव.

भारताविरूद्ध ऑस्ट्रेलियाची टीम

पॅट कमिंस (कर्णधार), एश्टन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स केरी, कॅमरून ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लियोन, लांस मॉरिस, टोड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ (उपकप्तान), मिशेल स्वेपसन, डेविड वॉर्नर

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा (टेस्ट सीरिज शेड्यूल):

  • पहिली टेस्ट- 9 ते 13 फेब्रुवारी, नागपुर
  • दूसरी टेस्ट- 17 ते 21 फेब्रुवारी, दिल्ली
  • तिसरी टेस्ट- 1 ते 5 मार्च, धर्मशाला
  • चौथी टेस्ट- 9 ते 13 मार्च, अहमदाबाद