Asia Cup 2023 : भारताचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला धक्का; एशिया कपचं यजमानपद हिसकावणार!

या बैठकीमध्ये पीसीबी (PCB) चे नवे अध्यक्ष नजम सेठी तसंच भारतीय क्रिकेट बोर्ड के अध्यक्ष (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांचाही सहभाग होता.

Updated: Feb 5, 2023, 01:11 PM IST
Asia Cup 2023 : भारताचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला धक्का; एशिया कपचं यजमानपद हिसकावणार! title=

Asia Cup in Pakistan: यंदाच्या वर्षी होणाऱ्या एशिया कप (Asia Cup 2023) संदर्भात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (Pakistan cricket board) गोची झालेली दिसून येतेय. भारतापुढे अखेरीस पाकिस्तानला हार मानावी लागण्याची चिन्ह आहेत. आशिया कपचं यजमानपद पाकिस्तानकडून हिसकावल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. एशिया कप 2023 संदर्भात शनिवारी 4 फेब्रुवारी रोजी बहरीनमध्ये एशियन क्रिकेट काउंसिल (ACC) ची इमरजेंसी बैठक झाली आहे.

या बैठकीमध्ये पीसीबी (PCB) चे नवे अध्यक्ष नजम सेठी तसंच भारतीय क्रिकेट बोर्ड के अध्यक्ष (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांचाही सहभाग होता. या बैठकीनंतर पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. 

Asia Cup 2023 च्या यजमानपदावरून पाकिस्तानला मोठा झटका

एशिया कप (Asia Cup 2023) यजमानपदाचा अधिकार सुरुवातील पाकिस्तानला देण्यात आला होता. ही स्पर्धा सप्टेंबर 2023 मध्ये खेळवण्यात येणार आहे. मात्र BCCI सचिव जय शाह (Jay Shah) यांनी पहिल्यांदात स्पष्ट केलं होतं की, टीम इंडिया एशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही. या निर्णयाने पाकिस्तानमध्ये खूप मोठी खळबळ माजली. 

दरम्यान जय शहा यांच्या विधानानंतर पीसीबी अध्यक्ष रमीज राजान यांनी वर्ल्डकपसाठी भारतामध्ये न जाण्याची धमकी दिली. यामध्ये बीसीसीआयचे सिनीयर अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, एसीसीच्या सदस्यांशी आज भेट झाली आणि त्यामध्ये फार सकारात्मक चर्चा झाली. मात्र स्थळ बदलण्याबाबतचा निर्णय मार्चपर्यंच स्थगित करण्यात आला आहे. मात्र भारत पाकिस्तानमध्ये जाणार नाही, त्यामुळे टूर्नामेंट दुसऱ्या ठिकाणी खेळवली जाईल. 

UAE ला मिळू शकतं Asia Cup 2023 यजमानपद

शनिवारी बहरीनमध्ये झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीमध्ये यजमानपदाचा मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी ACC ने महाद्वीपीय संस्थेचं वेळापत्रक रिलीज केलं, ज्यामध्ये पाकिस्तानचे यजमान म्हणून नाव नव्हतं.

मात्र यामध्ये संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील 3 स्थळं दुबई (Dubai), अबुधाबी (Abu Dhabi) आणि शारजाह (Sharjah) स्पर्धेच्या यजमानपदांसाठी पर्याय म्हणून ठेवण्यात आली. ज्यावर आशियाई क्रिकेट परिषद (ACC) मार्चमध्ये आशिया कप वनडे स्पर्धेसाठी पर्यायी ठिकाण ठरवणार आहे.