अन् वानखेडेवर विराट कोहलीने भुवनेश्वर कुमार समोर मान झुकवली....

वानखेडेवर आजपासून भारत - न्यूझिलंडदरम्यानच्या एकदिवसीय सामन्यांना सुरूवात झाली आहे.

Updated: Oct 22, 2017, 07:59 PM IST
अन् वानखेडेवर विराट कोहलीने भुवनेश्वर कुमार समोर मान झुकवली....  title=

मुंबई : वानखेडेवर आजपासून भारत - न्यूझिलंडदरम्यानच्या एकदिवसीय सामन्यांना सुरूवात झाली आहे.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी  करण्याचा निर्णय घेतला. भारताने न्युझिलंडसमोर २८१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. 

भारत -न्युझिलंडचा आजचा सामना कर्णधार विराट कोहलीसाठी खास होता.आज विराट २०० वा एकदिवसीय सामना खेळत होता. या सामन्यात विराटने रिकी पॉंटिंगचा रेकॉर्ड मोडत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये ३१ वे शतक ठोकले आहे. 

भारतीय संघाची सुरूवात थोडी रखडत झाली. मात्र हळूहळू भारताने खेळ रंगवला. विराट कोहलीने शतकं ठोकल्यानंतर त्याचा आनंद सेलिब्रेट करतानाच इतर खेळाडूंच्या उत्तम खेळाला तात्काळ दाद देण्याचे स्पोर्ट्समॅन स्पिरीट आज वानखेडेवर दिसलं. 

भुवनेश्वर कुमारच्या तुफान षटकाराला दाद देताना विराट कोहलीने त्याला मान झुकवून दाद दिली. भुवनेश्वर कुमारने षटकार ठोकल्यानंतर गोलंदाजासोबतच विराटही आश्चर्यचकित झाला होता. त्याने भुवनेश्वर कुमारला मान झुकवून अभिवादन केले. 

 

हार्दीक पांड्या आऊट झाल्यानंतर विराट कोहलीला साथ देण्यासाठी भुवनेश्वर कुमार मैदानात आला होता. भुवनेश्वर कुमारच्या मदतीने शेवटच्या ८ओव्हर्समध्ये ७७ धावा बनवल्या. यामध्ये भुवनेश्वरने १५  चेंडूमध्ये 2 चौकार आणि षटकारांसह २६ धावा बनवल्या.