विराट, कुलदीप नव्हे हा आहे टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी घेतलीये. या विजयात चायनामन कुलदीप यादव आणि विराट कोहली यांनी मोलाची भूमिका बजावली. मात्र एक नाव असेही आहे जो या विजयाचा शिल्पकार आहे तो म्हणजे भुवनेश्वर कुमार.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Sep 22, 2017, 04:18 PM IST
विराट, कुलदीप नव्हे हा आहे टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार title=

कोलकाता : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी घेतलीये. या विजयात चायनामन कुलदीप यादव आणि विराट कोहली यांनी मोलाची भूमिका बजावली. मात्र एक नाव असेही आहे जो या विजयाचा शिल्पकार आहे तो म्हणजे भुवनेश्वर कुमार.

भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २५३ धावांचे आव्हान ठेवले होते. ऑस्ट्रेलियासाठी खरतरं हे आव्हान मोठे नव्हते. विशेषकरुन जेव्हा खेळपट्टीवर डेविड वॉर्नरसाऱखा फलंदाज असेल. मात्र भुवीने भारताला चांगली सुरुवात करुन दिली. पहिल्या ५ ओव्हरमध्येच ऑस्ट्रेलियाचे दोन सलामीवीर तंबूत परतले. 

भुवनेश्वरने दोन धावा देताना सुरुवातीला हिल्टन कार्टराईटला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर ९ धावांवर डेविड वॉर्नरला अजिंक्य रहाणेच्या हाती झेल देत बाद केले. 

भुवनेश्वरने सुरुवातीच्या दोन विकेट घेतल्याने ऑस्ट्रेलिया संघावरील दबाव वाढला. भुवीने ६.१ षटकांत ९ धावा देताना ३ महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. १०हून कमी धावा देताना ३ आणि ३ हून अधिक विकेट घेण्याची कामगिरी त्याने दोनवेळा केलीये.